Satara : भाजपने केला शिवराज पाटलांचा निषेध; प्रतिमेस मारले जोडे

हिंदू धर्म Hindu Religion आणि धर्म ग्रंथावरील Dharma book टीका यापूढे सहन केली जाणार नाही. त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा विकास गोसावी Vikas Gosavi यांनी दिला.
BJP Andolan Satara
BJP Andolan Satarasarkarnama

सातारा : काँग्रेसचे नेते व माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांनी भगवद्‍गीतेचा दाखला देत अपशब्द वापरल्याबद्दल भाजपने साताऱ्यात श्री. पाटील यांचा निषेधार्थ आंदोलन करून त्यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेस जोडे मारले.

भाजपचे सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी आणि सातारा ग्रामीणचे अध्यक्ष राजेंद्र इंगळे यांच्या नेतृत्वाखाली साताऱ्यात पोवई नाका येथे निषेध आंदोलन झाले. यावेळी शिवराज पाटील यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले. काँग्रेसचे नेते व माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांनी जाहीर सभेत श्रीकृष्ण, अर्जुन आणि भगवद्‌गीतेबद्दल अपशब्द वापरून हिंदू धर्माबद्दल अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला आहे.

भगवद्‍गीता हा फक्त भारतातच नव्हे तर पूर्ण जगभरात पूजनीय आणि अनुकरणीय असा ग्रंथ आहे. त्याबद्दल अपशब्द वापरणे म्हणजेच देशाबद्दल अपशब्द वापरण्यासारखेच आहे. शिवराज पाटील आणि काँग्रेसचा आम्ही निषेध करतो. हिंदू धर्म आणि धर्म ग्रंथावरील टीका यापूढे सहन केली जाणार नाही. त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा विकास गोसावी यांनी दिला.

BJP Andolan Satara
Satara : बारामतीनंतर महादेव जानकर घालणार सातारा जिल्ह्यात लक्ष...

यावेळी शहराध्यक्ष विकास गोसावी, ग्रामीणचे अध्यक्ष राजेंद्र इंगळे, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, उपाध्यक्ष राहुल शिवनामे, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष निलेश नलावडे, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष शैलेंद्र कांबळे,व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष डॉक्टर सचिन साळुंखे, सिने कलाकार आघाडी जिल्हाध्यक्ष विकास बनकर, बेटी बचाओ बेटी पढाओ जिल्हाध्यक्ष अश्विनी हुबळीकर, उद्योजक आघाडी जिल्हाध्यक्ष निलेश शहा, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष तेजस जमदाडे, प्रवीण शहाणे, यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

BJP Andolan Satara
BJP: पक्षासाठी ३० वर्षे काम केलं,पक्षाने किड्या-मुंगीसारखं बाजूला केलं, भाजप नेता ओक्साबोक्शी रडला...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com