मुंबई : किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी (Wine Sale) उपलब्ध करून देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं घेतला आहे. ठाकरे सरकारच्या (Thackeray Government) या निर्णयानंतर भाजप नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी भाजप नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. त्याला भाजपचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी प्रत्युत्तर दिलं. खोतांनी टि्वट करीत मलिकांवर निशाणा साधला आहे.
दोन दिवसापूर्वी नवाब मलिक म्हणाले होते की, भाजपचे नेते विखे पाटील यांचा दारूचा रॉकेट ब्रॅण्ड आहे. तसंच भाजपचे नेते हे बंद करणार आहेत का ? भाजपच्या नेत्यांची वाईनची दुकाने आहेत ती बंद करणार आहेत का? असा सवाल उपस्थित करतच दारू पिणारे सगळ्यात जास्त भाजपचे नेते आहेत. दारू म्हणजे औषध आहे. ”थोडी थोडी पिया करो” असा मंत्र चार दिवसांपूर्वी साध्वी प्रज्ञासिंग यांनीच दिला आहे.
“सर्वात जास्त दारू पिणारे लोक भाजपमध्ये असल्याचे नवाब मलिक म्हणतात. व्वारे.. व्वा.. नवाब साहेब, हर्बल गांजा वाले आपली नशा सत्तेची असल्याने असं बिन बुचाचं सुचतयं आहे. प्रश्न कोण दारू पीत आहे हा नाही तर, दारू कुठे विक्री साठी उपलब्ध करून दिली जात आहे याचा आहे”, असे टि्वट सदाभाऊ खोत यांनी केले आहे.
''मध्यप्रदेश, गोवा, हिमाचल प्रदेश सरकारने असाच निर्णय घेतला होता की नाही हे भाजपने अगोदर सांगावे. भाजप त्यांच्या नेत्यांचे दारू बनवण्याचे परवाने परत करणार का हा आमचा प्रश्न आहे. अनेक नेते मद्यही बनवत आहेत. अनेकांची तर मद्य विक्रीची दुकाने आहेत. त्यामुळे सर्वाधिक दारू पिणारे लोकं भाजपात असून भाजपने दारू पिणार नाही अशी शपथ घ्यावी,'' असा टोला मलिकांनी भाजपच्या नेत्यांना लगावला होता.
भाजपाचे नेते, माजी मंत्री अनिल बोंडे (Anil Bonde) यांनीही ठाकरे सरकारवर यावरुन टीका केली आहे. अनिल बोंडे म्हणाले, ''नथुराम गोडसेंनी फक्त ३० जानेवारीला एकदाच महात्मा गांधींची(Mahatma Gandhi) हत्या केली. पण हे महाविकास आघाडी सरकार रोज महात्मा गांधींची हत्या करत आहे,''
''महात्मा गांधींची शिकवण आहे की दारुबंदी झाली पाहिजे. पण हे सरकार तर किराणा दुकानात दारु विकायला लावते! वाईन म्हणजे दारु नाही, असा युक्तीवाद राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार करत आहे. तस असेल तर महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर संत्र्याच्या रसाऐवजी वाईन विका! असा टोमणा बोंडे यांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.