
दहिवडी : दहिवडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडीत नाट्यमय घडामोडी घडत आज भाजप व शिवसेनेच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने उद्या (गुरूवारी) होणाऱ्या निवडीत राष्ट्रवादीच्या सागर पोळ यांच्या नगराध्यक्षपदी निवडीची फक्त औपचारिकता उरली आहे.
माण तालुक्यातील दहिवडी नगरपंचायत निवडणूक सुरुवातीपासून गाजली. त्यात अपक्षाच्या मदतीने राष्ट्रवादीला काठावरचे बहुमत मिळाले होते. राष्ट्रवादीच्या महेश जाधव यांच्या बंडाने वातावरण ढवळले होते. मात्र, त्यांनी माघार घेतल्याने हे बंड शमले. त्यानंतर भाजपचे धनाजी जाधव व शिवसेनेच्या सुरेखा पखाले यांच्यापैकी कोण माघार घेणार, की दोन्ही अर्ज राहणार. तसेच कोण कोणाला साथ देणार, याबद्दल चर्चा घडू लागल्या.
काहीतरी चमत्कार घडेल अशी अपेक्षा भाजप व सेनेच्या कार्यकर्त्यांना होती. मात्र, प्रयत्न करूनही विजयाचे गणित जुळत नाही, हे लक्षात येताच आज धनाजी जाधव व सुरेखा पखाले यांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे राष्ट्रवादीचे सागर पोळ यांचा एकमेव उमेदवारी अर्ज शिल्लक राहिला आहे. त्यामुळे उद्या (गुरूवारी) त्यांच्या बिनविरोध निवडीची फक्त औपचारिकता राहिली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.