सत्ता हवी म्हणून फेव्हिकॉल सारखे चिकटले!

निधी वाटपावरुन आघाडीत (Mahavikas Aghadi) धुसफूस सुरु आहे.
Chandrakant Patil, Bjp
Chandrakant Patil, BjpSarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूर : राज्यात काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेनेची (shivsena) महाविकास आघाडी सत्तेत असली तरी या तीन्ही पक्षात सर्व काही अलबेल नाही. निधी वाटपावरुन आघाडीत (Mahavikas Aghadi) धुसफूस सुरु आहे. यावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

पाटील म्हणाले, काँग्रेसचे 25 ते 26 आमदार नाराज आहेत. शिवसेनेचे आमदार नाराज आहेत. शिवसेनेच्या आमदारांना निधी मिळत नाही म्हणून ते नाराज आहेत. राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार नाराज असेले तरी ते चेहऱ्यावर दाखवत नाहीत, यांना सत्ता हवी म्हणून फेव्हिकॉल सारखे चिकटले आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

Chandrakant Patil, Bjp
कोल्हापूर उत्तरमध्ये वातावरण तापलं! 21 जणांच्या तडीपारीचे प्रस्ताव; गुन्हेगारांची धरपकड सुरू

या वेळी बोलताना त्यांनी कोल्हापूर उत्तरच्या पोट निवडणुकीवरुन पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ताराराणींच्या शहरात पहिली महिला आमदार व्हावी, असे सजेत पाटील म्हणतात, मग त्यावेळी का नाही केले, असा सवाल त्यांनी केला. भाजपच्या 15 महिला विधान सभेत आहेत. तुमच्या किती आहेत असेही पाटील म्हणाले. आम्ही विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढत आहोत. कोल्हापूर पुरात आम्ही सर्वांना मदत केली. कोल्हापुरात भाजपचा आमदार निवडून येईल, अशा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.

कठीण राजकीय काळात काँगेससह इतर प्रादेशिक पक्षांचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले पाहिजे, असा ठराव राष्ट्रीय युवक कार्यकारणीच्या बैठकीत मांडण्यात आला. त्या विषयी पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले, अन्य पक्षांनी काय करावे हा माझा विषय नाही. पवारांवर बोलन्यासाठी मी राजकीय विश्लेशक नाही.

Chandrakant Patil, Bjp
नाना पटोलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र ; केली ही विनंती

शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपचे खासदार वरुन गांधी (Varun Gandhi) यांची भेट घेतली, त्यावर पाटील या प्रश्न विचारला असता ते म्हणाले, राजकारनात एकमेकांना भेटणे स्वाभाविकच आहे. त्यात वेगळा अर्थ काढू नये. रिफायनरी प्रकल्पावर ते बोलताना पाटील म्हणाले, उशिरा का होईना पण शहाणपण सुचले आहे. करुणा शर्मा कोल्हापूरमध्ये निवडणूक लढवत आहेत. त्यावर पाटील म्हणाले, करुणा शर्मा यांनी आक्रोश केला तरी त्याना न्याय मिळत नाही. त्यांनी धनंजय मुंडे यांच्यापासून आपल्याला दोन मुले असल्याचे म्हटले आहे, असेही पाटील यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com