Bawankule On Khadse : '' पक्ष आपली आई असते,खडसे आईलाच सोडून गेले आणि आता...''; बावनकुळेंनी सुनावलं

NCP Vs BJP Political News : '' जुन्या पक्षावर टीका करून खडसेंनी स्वतः ची उंची कमी करू नये...''
Bawankule On Khadse
Bawankule On Khadse Sarkarnama
Published on
Updated on

विश्वभूषण लिमये

Solapur : पूर्वाश्रमीचे भाजप नेते व सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांना पुन्हा भाजपामध्ये येण्याची ऑफर विनोद तावडे यांनी दिली आहे. यानंतर राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. याचवेळी एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये माझा छळ झाल्याचा आरोप केला होता. यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खडसेंना खडेबोल सुनावले आहेत.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) हे आज (दि.७) सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर रोखठोक मत व्यक्त केले आहे. बावनकुळे म्हणाले, खडसेसाहेब आमच्यासाठी आदरणीय आहेत आणि राहतील. पण ज्यावेळेस आपण पक्ष सोडतो त्याबद्दल बोलायचं नसतं. ती आपली आई असते. ज्या आईने आपल्याला दूध पाजलेलं असतं. ज्या आईनं आपल्याला मोठं केलं. पद,प्रतिष्ठा दिली आणि तिलाच तुम्ही सोडून गेलात अशी बोचरी टीकाही त्यांनी यावेळी खडसेंवर केली आहे.

Bawankule On Khadse
Sharad Pawar-Sanjay Raut In Chhatrapati Sambhajingar : पवार, राऊत हे दोन मोठे नेते एकाचवेळी मराठवाड्यात..

शेवटी पक्ष मोठा...

आज ४०-४० वर्षे तुम्हाला पदे दिली, ते विसरता येत नाही. त्या दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन आपली उंची वाढवण्यासाठी ते टीका करतात, ते तुमच्यासाठी योग्य आहे.तुम्हाला ज्या पक्षाने मोठं केलं त्या पक्षाबद्दल धन्यताच मानली पाहिजे. शेवटी पक्ष मोठा आहे, माणसं मोठी नाहीत. तुम्ही जुन्या पक्षावर टीका करणे,तुमची उंची आहे, ती कमी करण्यासारखं आहे. तुम्ही त्या पक्षात सुखी राहा, ज्या पक्षांनी तुम्हाला इतकं दिलं, तुमची मात्र त्याची उंची कमी करू नका असं विधान त्यांनी केलं आहे. खडसेंनी जुन्या पक्षावर टीका करून स्वतः ची उंची कमी करू नये असा पलटवारही चंद्रशेखर बावनकुळेंनी केला आहे.

खडसे नेमकं काय म्हणाले होते ?

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे(Vinod Tawde) यांनी दिलेल्या ऑफरवर एकनाथ खडसेंनी भाष्य केलं होतं. यावेळी ते म्हणाले, मी कुठल्याही परिस्थितीत भाजपात परत जाणार नाही. तसेच ज्या पक्षासाठी इतकं केले, त्या पक्षाने मला वाऱ्यावर सोडलं. २०१४ पासून माझा ज्या पक्षात छळ झाला. अनेक चौकशा लावण्यात आल्या, त्या पक्षात आता मी पुन्हा जाणार नाही. भाजपमध्ये ज्यांच्यावर मोठे मोठे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, ते पक्षात येऊन स्वच्छ झाले.

Bawankule On Khadse
Delhi Politics: मनीष सिसोदियांची आठवण काढताच भर कार्यक्रमात केजरीवाल ढसढसा रडले...

पण अडचणीच्या काळात शरद पवार(Sharad Pawar) यांनी मला विधानपरिषदचं सदस्य बनवून राजकीय विजनवासातून बाहेर काढले. त्यामुळे भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com