Sharad Pawar-Sanjay Raut In Chhatrapati Sambhajingar : पवार, राऊत हे दोन मोठे नेते एकाचवेळी मराठवाड्यात..

Mahavikas Aghadi : पण दोघांनीही एकमेकांची भेट घेतली नाही किंवा तसा प्रयत्न देखील केला नाही.
Sharad Pawar, Sanjay Raut In C.Sambhajinagar News
Sharad Pawar, Sanjay Raut In C.Sambhajinagar NewsSarkarnama
Published on
Updated on

Mahavikas Aghadi : राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागा वाटपावरून मंथन सुरू आहे. आघाडीतील तीनही पक्ष स्वतंत्रपणे आपापल्याकडे असलेल्या व इतर लोकसभा मतदारसंघांचा आढावा देखील घेत आहेत. (Sharad Pawar-Sanjay Raut In Chhatrapati Sambhajingar) काही ठिकाणी एकमेकांच्या मतदारसंघावर दावे सांगितले जात असल्याने आघाडीत बिघाडी होती का? याकडे विरोधक डोळे लावून बसले आहेत.

Sharad Pawar, Sanjay Raut In C.Sambhajinagar News
Sharad Pawar's Friendship: मैत्री जपणारा नेता, मित्र आजारी असल्याचे समजताच पवारांची हाॅस्पीटलमध्ये धाव..

अशावेळी महाविकास आघाडीचे दोन मोठे नेते एकाचवेळी छत्रपती संभाजीनगरात दाखल झाले. ते म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) आणि दुसरे ठाकरे गटाचे नेते, प्रवक्ते खासदार संजय राऊत. (Sanjay Raut) मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर शिवसेना शाखेच्या वर्धापनदिना निमित्त राऊत कालच शहरात दाखल झाले. तर शरद पवार हे देखील सौहार्द बैठकीसाठी कालच शहरात आले होते.

विशेष म्हणजे दोन्ही नेते दुसऱ्या दिवशी देखील शहरातच होते. अगदी आजूबाजूच्या हाॅटेलमध्ये (Mahavikas Aghadi) पण दोघांनीही एकमेकांची भेट घेतली नाही किंवा तसा प्रयत्न देखील केला नाही. शरद पवार यांनी जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद येथील राष्ट्रवादीच्या महिला नगराध्यक्षांच्या घरी भेट तिथे पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. तर संजय राऊत हे देखील जिल्ह्यातील ज्येष्ठ शिवसैनिकांशी चाय पे चर्चा करणार आहेत.

या शिवाय विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निधीतून शासकीय रुग्णालयला देण्यात येणाऱ्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करणार आहेत. या शिवाय उद्या (ता.८) जून रोजीच्या शिवसेना शाखा वर्धापनदिना निमित्त आयोजित कार्यक्रमात देखील राऊत सहभागी होणार आहे. दरम्यान, मराठवाड्यातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा देखील संजय राऊत हे घेणार असल्याचे सांगितले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com