Sangli News : बांगलादेशमध्ये काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अराजकता निर्माण झाली असून पंतप्रधानपदाचा राजीनामा देत शेख हसीना या आश्रयासाठी भारतात दाखल झाल्या आहेत. त्यांनी देश सोडल्यानंतर बांगलादेशमध्ये हिंसाचार अधिकच उफाळलला आहे. याचदरम्यान,बांगलादेशमधील अराजकतेवरुन विरोधकांनी मोदी सरकारवरही निशाणा साधण्याची संधी सोडली नाही.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनीही बांगलादेशमधील परिस्थितीचा दाखला देत पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. आता त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.
माजी खासदार राजू शेट्टी यांनी लोकसभेतील पराभवानंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.तसेच त्यांनी छोट्या छोट्या घटक पक्षांना सोबत घेत महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुतीला सक्षम असा नवा पर्याय देण्यासाठी धडपड सुरू केली आहे.
माजी खासदार राजू शेट्टींनी आता थेट सत्ताधारी मोदी सरकार आणि महायुतीवर टीकेची तोफ डागण्यास सुरुवात केली आहे. अशातच आता त्यांनी बांगलादेशातील लोकांनी पंतप्रधानाला पळवून लावले,आपण का करू शकत नाही? असं वादग्रस्त विधान करत नवा वाद ओढवून घेतला आहे.
या त्यांच्या विधानावर आक्षेप घेत सांगलीत राजू शेट्टींच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यात भाजपच्या (BJP) महिला नेत्या नीता केळकर यांनी शेट्टींविरोधात तक्रार दाखल करत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.यामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे शेतकरी सहविचार सभेत बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. काल जन्माला आलेल्या बांगलादेशकडून आपल्या लोकांनी काही तरी शिकावं.जर त्या देशातील लोकांनी त्यांच्या पंतप्रधानाला पळवून लावले असेल तर आपण असं का करू शकत नाही, असा सवाल उपस्थित करत नव्या वादाला तोंड फोडले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.