विधान परिषद उमेदवारीबाबत सदाभाऊ खोतांचे वक्तव्य!

विधान परिषदेवर पुन्हा संधी द्यायची की नाही हे भाजप ठरवेल : सदाभाऊ खोत
Sadabhau Khot
Sadabhau KhotSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मी चळवळीतील माणूस आहे. मला भारतीय जनता पक्षाकडून (BJP) संधी मिळाली, आम्ही काम केलं. विधान परिषदेवर (MLC) पुन्हा संधी द्यायची की नाही, हे भारतीय जनता पक्ष ठरवेल, असे वक्तव्य माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केले. दरम्यान, विधान परिषदेवरून टीका करणाऱ्या अमोल मिटकरी यांनाही त्यांनी टोला लगावला आहे. (BJP will decide whether to give chance to Legislative Council : Sadabhau Khot)

Sadabhau Khot
‘संजय पवारांबरोबरच नंदूरबारच्या शिवसैनिकाचीही राज्यसभेसाठी चर्चा झाली होती’

विधान परिषदेच्या १० जागांसाठी येत्या २० जून रोजी निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी कोणाला उमेदवारी मिळणार आणि कोणाचा पत्ता कट होणार याची चर्चा राज्यात रंगली आहे. सदाभाऊ खोत यांना यावेळी थांबण्याचा सल्ला देण्यात आल्याचे सांगितले जात आहे, त्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर खोत यांनी वरील उत्तर दिले.

Sadabhau Khot
...तर शिवसेनेला ZP, पंचायत समितीत उमेदवार मिळणे मुश्कील होईल : शिवसैनिकांची व्यथा

सदाभाऊ खोत म्हणाले की, मला भाजपकडून विधान परिषदेवर संधी देण्यात आली. त्यानंतर ध्यानीमनी नसताना मंत्रीपदही दिले आहे. त्या ठिकाणी आम्ही करून दाखविले आहे, त्यामुळे संधी द्यायची की नाही, हा सर्वस्वी भारतीय जनता पक्षाचा निर्णय असेल.

Sadabhau Khot
'संभाजीराजे अन्‌ शिवसेनेतील हा विषय; इतरांनी त्यात चोमडेपणा करू नये'

अमोल मिटकरी यांनी केलेल्या टीकेबाबत सदाभाऊ म्हणाले की, आमदार अमोल मिटकरी चांगले वक्ते आहेत. मी भाषण करत असताना कहाण्या सांगून वर आलो नाही. मी लोकांच्य, जनतेच्या समस्या मांडल्या आणि वास्तव सांगून इथपर्यंत पोचलो आहे. अमोल मिटकरी यांनी मात्र वास्तव न मांडता ते इथपर्यंत पोचले आहेत. आम्ही इतिहास विकून नाही, तर इतिहास शिकून वर आलोय, असा सणसणीत टोलाही सदाभाऊंनी अमोल मिटकरी यांना लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com