‘संजय पवारांबरोबरच नंदूरबारच्या शिवसैनिकाचीही राज्यसभेसाठी चर्चा झाली होती’

राज्यातील सामान्य शिवसैनिकाला असं वाटतंय की आमच्यातील एक शिवसैनिक आमचा प्रतिनिधी म्हणून राज्यसभेत पाठवला आहे.
Shivsena
ShivsenaSarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूर : राज्यसभा (Rajya Sabha) निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली, त्यावेळी राज्यसभेची उमेदवारी कोणाला द्यायची, याची शिवसेनेत (shivsena) चर्चा विचारविनिमय सुरू झाला होता. त्यावेळी आमच्यासमोर फक्त सामान्य शिवसैनिकांचीच नावे होती. त्यात कोल्हापूरच्या संजय पवार (Sanjay Pawar) यांच्याबरेाबरच नंदूरबारचे पाडवी हे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याही नावाची चर्चा झाली होती. तेही एकांड्या शिलेदारासारखे लढत असतात. सर्वसामान्य कार्यकर्त्याला कधी ना कधी विधिमंडळात आणि संसदेत पाठवायाला हवं, या भूमिकेतून शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ही भूमिका घेतली, अशी माहिती खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली. (Sanjay Pawar with, Shiv Sainiks of Nandurbar were also discussed for Rajya Sabha candidature)

संजय राऊत हे शिवसंपर्क अभियानासाठी कोल्हापूरच्या दाेन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी विविध विषयांवर संवाद साधला. ते म्हणाले की, संजय पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर केवळ कोल्हापुरातीलच शिवसैनिकाला बळं दिलं असं नाही, तर राज्यातील सामान्य शिवसैनिकाला असं वाटतंय की आमच्यातील एक शिवसैनिक आमचा प्रतिनिधी म्हणून राज्यसभेत पाठवला आहे. आम्ही सर्वजण शिवसैनिकच आहोत. पण, तळागाळात काम करणारा, सतत संघर्ष करणाऱ्या सामान्य शिवसैनिकालाच उद्धव ठाकरे यांनी राज्यसभेत पाठविले आहे.

Shivsena
'राज्यसभा पुरस्कृत उमेदवारीबाबत मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजेंना ‘हे’ सांगितलं होतं!'

संभाजीराजेंना अपक्ष म्हणून पाठिंबा देणे आणि शिवसेनेची भूमिका यावरही संजय राऊत यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, संभाजीराजे छत्रपती यांच्या आरोपानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विश्वासर्हतेवर प्रश्न उपस्थित करणे चुकीचे आहे. राज्यसभेची सहावी जागा ही शिवसेनेची आहे. त्या जागेवर शिवसेनेचा उमेदवार आणायचा, हे आधीच ठरलं होतं. मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजेंना असं सांगितलं होतं की राज्यसभेसाठीच्या पुरस्कृत उमेदवारीबाबत मला माझ्या सहकाऱ्यांशी बोलावं लागेल, एवढंच ते संभाजीराजेंना बोलले आहेत.

Shivsena
राज्यसभेसाठी काँग्रेसकडून जयराम रमेश यांना उमेदवारी जाहीर

आमदार शिवेंद्रसिंह राजे यांनी केलेल्या टीकेचाही संजय राऊत यांनी समाचार घेतला ते म्हणाले की, शिवेंद्रसिंहराजे भोसले हे अपक्ष आहेत का? त्यांनी आतापर्यंत किती पक्ष बदलले आहेत. त्यांना पक्षाचे वावडे आहे का. त्यांच्या घराण्यामध्ये कोणी कितीवेळा पक्ष बदलेले. कोणकोणत्या पक्षात गेले. कशासाठी आम्हाला तोंड उघडायला लावता. महाराजांच्या गादीविषयी आम्हाला आदर आहे, तो कायम राहील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com