Solapur Politcs| अडगळीतल्या 'या' ताकदवान नेत्यांसाठी भाजपचा नवा प्लॅन

Solapur Politcs| आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर नव्या आणि दमदार चेहऱ्यांना संधी देण्यासाठी भाजपकडून हालचाली सुरु असल्याची चर्चा आहे.
Devendra Fadanvis
Devendra Fadanvis
Published on
Updated on

सोलापूर : राज्यातील संत्तासंघर्षांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटातील हालचालींनाही वेग आला आहे. आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर नव्या आणि दमदार चेहऱ्यांना संधी देण्यासाठी भाजपकडून हालचाली सुरु असल्याची चर्चा आहे. असे असतानात भाजपची ताकद वाढवण्यासाठी काही ताकदवान पण सध्या अडगळीत असलेल्या चेहऱ्यांची चाचपणी भाजपने सुरु केली असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

सोलापूरातील मोहोळ विधानसभा मतदारसंघात आमदारकीची हॅट्‌ट्रिक केलेल्या आणि तीनवेळा राष्ट्रवादीने दिलेल्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यात राजन पाटलांचा सिंहाचा वाटा आहे. तर अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यासारखा ताकदवान चेहरा आहे. पण मतदार संघात त्यांचे प्राबल्य असतानाही पक्षाने त्यांच्याकडे लक्ष न दिल्याने सध्या ते अडगळीत आहेत. सिद्धाराम म्हेत्रे यांच्याप्रमाणेच दिलीप माने, महेश कोठे यांचीही फार वेगळी परिस्थिती नाही. करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे आणि ‘विठ्ठल कारखान्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष अभिजित पाटील यांच्यासाठी भाजपमध्ये चाचपणी सुरु असल्याची चर्चा आहे.

Devendra Fadanvis
तीनऐवजी चारचा प्रभाग करण्याची भाजपची मागणी का?

-राजन पाटील

मोहोळ मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. पण राजन पाटील आणि त्यांचे चिरंजीव विक्रांत पाटील, अजिंक्यराणा पाटील यांनी याठिकाणी राष्ट्रवादीची ताकद वाढवून सलग ३० वर्षे वर्चस्व कायम राखले. या ३० वर्षांच्या काळात त्यांनी मतदारसंघात भाजप व शिवसेनेला जम बसवू दिला नाही.

-सिद्धाराम म्हेत्रे

तीन वेळा अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिलेले आणि माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांची आजही त्यांच्या मतदार संघात मोठा दबदबा आहे. पण २००९ मध्ये फक्त १३८५ मतांनी सिद्धाराम म्हेत्रेंचा सिद्रामप्पा पाटलांकडून त्यांचा पराभव झाला. तरीपण २०१४ मध्ये म्हेत्रे यांनी त्यांनी पराभवाचा वचपा काढत सिद्रामप्पांना हरवत धूळ चारली. मोदी लाटेतही त्यांची जादू चालली आणि ते आमदार झाले. २०१९ च्या निवडणुकीत मात्र पक्षातील वरिष्ठांकडून त्यांना म्हणावी तशी साथ न मिळाल्यामुळे ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली. त्यातच सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.

-दिलीप माने

सुशीलकुमार शिंदे हे केंद्रात गेल्यानंतर दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून दिलीप मानेंना संधी मिळाली. २००९ मध्ये ते आमदार झाले. पण, त्यानंतर त्यांनाही पक्षाकडून म्हणावी तशी संधी मिळाली न मिळाल्याने त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. आता शिवसेनेला लागलेल्या गळतीमुळे ते पुन्हा दुसऱ्या पक्षात जाण्याच्या अशी चर्चा सध्या सुरु झाल्या आहेत.

-संजय शिंदे

भाजपच्या मदतीने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झालेले संजय शिंदे सध्या करमाळा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष आमदार आहेत. राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत. आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने स्वबळावर सत्ता मिळवण्याची तयारी सुरु आहे. ते पाहता जर संजय शिंदेंनी भाजपला साथ दिली तर त्यांना पुन्हा आमदारकी मिळू शकते. पण, सध्या शिंदे गटासोबत असलेले माजी आमदार नारायण पाटील यांना कुठे संधी मिळणार, हे पाहणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

Devendra Fadanvis
शशी थरूर यांना 'भारतीय व्हेरियंट' भोवणार; खासदारकी रद्द करण्याची भाजपची मागणी

- महेश कोठे

मागील ३० वर्षांपासून सोलपूर शहराच्या राजकारणात विशेषत: महापालिकेत महेश कोठेंचे मोठे वर्चस्व आहे. सोलापूर महापालिकेत कॉंग्रेसची सत्ता आणण्यासाठी कोठेंचा मोलाचा वाटा आहे. पण सोलापूरला अनेकदा विधान परिषदेची संधी मिळूनही पक्षश्रेष्ठींना कोठेंना संधी दिली नाही. त्यामुळे आपल्याला डावलून इतरांना संधी दिल्याची खंत मनात ठेवून त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. महाविकास आघाडीचे सरकार असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना अनेकदा निवेदने देऊनही काहीच निधी मिळाला नाही. पण तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून त्यांना निधी मिळाला. अशात आपल्या समर्थक आणि नगरसेवकांसोबत मिळून राष्ट्रवादीत जाणार असल्याचे त्यांचे निश्चित झाले. मात्र, आता पुन्हा राज्यात सत्तांतर झाल्याने ते एकनाथ शिंदे व भाजपधील वरिष्ठांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे आता कोणत्या पक्षात जावे अशा द्विधा मनस्थिती असल्याचे दिसत आहे.

-अभिजित पाटील

तर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनीही स्वकर्तृवावर सोलापूरात स्वत:चे वलय निर्माण केले आहे. त्यांच्यावरही भाजपचे लक्ष ठेवूनआहे. ते कारखान्याचे अध्यक्ष झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना फोनवरून शुभेच्छा दिल्या होत्या. आता सोलापूर जिल्ह्यात भाजपची ताकद वाढविण्यासाठी भाजप काय करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com