BJP Politics : काँग्रेसच्या भाजपमुक्त कोल्हापूरच्या मनसुभ्याला सुरुंग, स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीतही बसणार धक्का?

BJP Politics Congress : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर आणि इचलकरंजी विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेले यश महत्त्वाचे मानले जाते.
BJP VS Congress
BJP VS CongressSarkarnama
Published on
Updated on

BJP Politics : 2014 नंतर प्रथमच कोल्हापूर जिल्ह्यात भाजपने दोन आमदार मिळवले. मात्र 2019 च्या निवडणुकीत भाजपच्या वरिष्ठ मंडळींनी कोल्हापूर जिल्हा भाजपमय करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले. भाजपचे वाढलेले प्रस्थ पाहता काँग्रेसने टाकलेले डावपेच कामी आले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे कोल्हापूर भाजपमुक्त करण्यासाठी काँग्रेसने आघाडी घेतली.

कोल्हापूर जिल्हा भाजपमुक्त करण्याचा काँग्रेसचा आनंद 2024 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंतच राहिला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात भाजपने काँग्रेसला भोपळाही फोडू दिला नाही. मात्र स्वतःचे दोन आमदार निवडून आणले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप जिल्ह्यातील जाळे अधिकच विस्तीर्ण करण्याच्या तयारीत आहे.

BJP VS Congress
Rohit Pawar : अजितदादा पार्टीत नसतील तर कसं होईल? रोहित पवारांची विधानसभेत टोलेबाजी, सत्ताधाऱ्यांमध्ये चुळबुळ

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर आणि इचलकरंजी विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेले यश महत्त्वाचे मानले जाते. यापूर्वी कोल्हापूर महानगरपालिकेवर भाजपचे 14 नगरसेवक निवडून आले आहेत. तर इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणूक पहिल्यांदाच होणार आहे.

विधानसभा निवडणुकीत इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे राहुल आवाडे आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघातून अमल महाडिक यांचा विजय आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

इचलकरंजी महानगरपालिकेसाठी पहिल्यांदाच निवडणूक होणार असून महाविकास आघाडी कडून ही निवडणूक एकत्रित लढवली जाणार आहे. मात्र महायुतीचे पारंपारिक विरोधक एकत्र आल्याने भाजपसाठी ही महानगरपालिका महत्त्वाची वाटू लागली आहे. माजी आमदार सुरेश हळवणकर आणि आवडे एकत्र आल्याने भाजपचे बळ वाढले आहे. त्यामुळे कोल्हापूर पाठोपाठ इचलकरंजी महापालिकेत भाजपचे प्राबल्य आगामी निवडणुकीत दिसणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

कोल्हापूर महापालिका स्वबळावर?

कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत देखील हीच परिस्थिती आहे. मात्र मागील महानगरपालिका निवडणूक ही ताराराणी आघाडी आणि भाजप यांनी युती करून लढवली होती. भाजपचे 14 आणि ताराराणी आघाडीचे 19 नगरसेवक निवडून आले होते. भाजप सत्तेच्या जवळपास असताना शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत आघाडी करत सत्ता स्थापन केली.

आता मात्र समीकरणे बदलली आहेत. तर ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम हे शिवसेनेत गेल्याने ताराराणी आघाडी ही भाजपमध्ये विसर्जित होऊन कोल्हापूर महापालिका निवडणुकीत भाजप स्वबळावर उतरण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे या दोन शहरात भाजप वाढीला आणखी बळ मिळणार आहे.

BJP VS Congress
Raj Thackeray : ...ही लाचारी कशातून येते? सरकारला ठणकावत राज ठाकरेंनी दिला सणसणीत इशारा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com