Solapur BJP Yuva Morcha : निष्ठावंतांसह नवख्यांचा समावेश असलेली भाजप युवा मोर्चाची सोलापूर जिल्हा कार्यकारिणी जाहीर; अक्कलकोटचे वर्चस्व

Executive Committee Announcement : भाजप युवा मोर्चाच्या सोलापूर पूर्व विभागाची 53 सदस्यांची जंबो कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष महेश बिराजदार यांनी जाहीर केली. कार्यकारिणीत अक्कलकोटचे वर्चस्व असून जुन्या नव्या कार्यकर्त्यांना स्थान मिळाले.
Solapur BJP
Solapur BJPSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 12 September : भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाची सोलापूर जिल्ह्याची (पूर्व विभाग) तब्बल ५३ सदस्यांची जंबो कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष महेश बिराजदार यांनी जाहीर केली. युवा मोर्चाच्या कार्यकारिणीवर अक्कलकोटचे वर्चस्व दिसून येत आहे. निष्ठावंत आणि नव्याने पक्षात आलेल्या कार्यकर्त्यांचा मेळ घालून ही कार्यकारिणी बनविण्यात आली आहे.

दरम्यान, सोलापूर जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या जिल्हा कार्यकारिणीमध्ये 12 उपाध्यक्ष, 04 सरचिटणीस, 14 चिटणीस आणि एका कोषाध्यक्ष, सोशल मीडियाप्रमुख, सहप्रमुख आणि इतर सदस्यांचा समावेश आहे. या कार्यकारिणीवर अक्कलकोटचा वरचष्मा असून त्याखालोखाल दक्षिण सोलापूरचे प्रतिनिधी आहेत.

युवकांचे संघटन करून पक्षसंघटना अधिक बळकट करणे, तसेच भाजपची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा आणि मोहोळ या सर्व तालुक्यांना यात प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.

ओमराज बाणेगाव, प्रभाकर बिराजदार, अनुप देवधर आणि विशाल चौधरी यांची जिल्हा सरचिटणीसपदी, तर संतोष पोमाजी, दत्तात्रय डांगे, विशाल जाधव, शिवराज कालदे, प्रथमेश पाटील, केदार कराळे, राम मोरे, अजित लेंडवे, नितीन मोरे, सुनील भोसले, महेश राऊत आणि लिंगराज शेंडगे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Solapur BJP
Satara Dcc Bank : साताऱ्यात मोठ्या घडामोडी : रामराजेंच्या उपस्थितीत मातब्बर नेत्यांची जिल्हा बॅंक निवडणुकीबाबत खलबतं

आकाश माशाळे यांच्याकडे जिल्हा कोषाध्यक्षपद, सुदर्शन खांडेकर यांच्याकडे सोशल मीडिया प्रमुखपद, विनायक बडूरे यांच्याकडे सोशल मीडिया सहप्रमुखपद, ओंकार येणेगुरे यांच्याकडे जिल्हा कार्यालय प्रमुखपद, तर वैभव मुलगे यांच्याकडे जिल्हा कार्यालय सहप्रमुखपद देण्यात आले आहे. याशिवाय विविध तालुक्यांतील युवा कार्यकर्त्यांची जिल्हा चिटणीस व जिल्हा सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

Solapur BJP
Market Committee Federation : भाजपने डाव टाकलाच : बाजार समिती संघाच्या राष्ट्रवादीच्या सभापतीविरोधात अविश्वास ठराव दाखल, सुनेत्रा पवारांच्या भूमिकेकडे लक्ष

नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून जिल्ह्यात भाजपचे संघटनात्मक काम अधिक वेगाने करण्याचा प्रयत्न राहील. पक्षाच्या विचारांचा प्रचार व प्रसार करत युवा कार्यकर्त्यांना संघटित केले जाईल, असे जिल्हाध्यक्ष महेश बिराजदार यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com