Congress Jansamvad Yatra : भाजपकडून देशात ब्रिटिशनीतीचा अवलंब; काँग्रेस जिल्हाध्यक्ष मोहिते पाटलांचा आरोप

Dhavalsinh Mohite Patil News : मधल्या राजकीय घडामोडींमुळे पक्ष अडचणीत होता.
Dhavalsinh Mohite Patil
Dhavalsinh Mohite Patil Sarkarnama

Mangalveda News : भारतीय जनता पक्षाकडून ‘फोडा, झोडा आणि राज्य करा’ या ब्रिटिशनीतीचा अवलंब केला जात आहे. त्याला प्रत्युत्तर फक्त काँग्रेस पक्ष देऊ शकतो, असा दावा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी केला. (BJP's adoption of British policies in the country: Dhavalsingh Mohite Patil's allegation)

मंगळवेढा येथील काँग्रेस कार्यालय ते प्रांत कार्यालयापर्यंत जनसंवाद यात्रेच्या सुरुवातीला धवलसिंह बोलत होते. धवलसिंह मोहिते पाटील म्हणाले की, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे आणि सहकाऱ्यांनी काँग्रेसचे चांगले संघटन उभे केले आहे. मधल्या राजकीय घडामोडींमुळे पक्ष अडचणीत होता. मात्र, लोकसभेत आता सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला बळकटी आणण्यासाठी काम करावे लागेल. महिला, युवा शक्तीच्या माध्यमातून परिवर्तन लाट येईल.

Dhavalsinh Mohite Patil
Pankaja Munde Shiv Shakti Parikrama : पंकजा मुंडेंच्या मनात तरी काय?; ‘राज्याच्या राजकारणात सक्रिय नाही, पण ‘वेट ॲण्ड वॉच...’

मीडिया व सोशल मीडियाचा वापर करून भाजप जातीय सलोखा बिघडवू पाहत आहे. त्यातून मोदीच कसे श्रेष्ठ आहेत, हे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. रक्षाबंधनच्या नावाखाली गॅसदर कमी करून भगिनींना आशीर्वाद मागत आहेत. मात्र, गेल्या साडेनऊ वर्षांत बहिणीला महागाई वाढवून आर्थिकदृष्ट्या अडचणीत आणले आहे, असेही त्यांनी नमूद केले.

तालुकाध्यक्ष साळे म्हणाले की, पावसाचा सामना करत राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा यशस्वी केली. मंगळवेढ्यात सुशीलकुमार शिंदे आणि (स्व.) प्रतापसिंह मोहिते पाटील यांना मानणारा वर्ग आहे. त्यात समन्वय साधून विविध सेलच्या निवडी केल्या आहेत. आगामी निवडणूक काँग्रेससाठी महत्त्वाची आहे. काँग्रेस सत्तेवर न आल्यास रस्त्यावरून फिरणे मुश्किल होईल म्हणून लोकसभेत सोलापूरचा आवाज पुन्हा पाठवूया.

Dhavalsinh Mohite Patil
Dispute In Kolhapur BJP : चंद्रकांतदादांच्या कोल्हापूर भाजपत मोठा उद्रेक; निष्ठावंतांना डावलल्याने पक्ष कार्यालय बंद करण्याचा निर्णय, फलकही काढला

या वेळी काँग्रेसच्या विविध सेल व पदाधिकारी निवडीची १६० जणांना जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते पत्रे देण्यात आली. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस कार्यालयापासून प्रांत कार्यालयावर चालत जाऊन तालुक्याला भेडसावणाऱ्या समस्यांचे निवेदन प्रांत कार्यालयात दिले.

Dhavalsinh Mohite Patil
Kishori Pednekar Troubled : ठाकरे गटाच्या नेत्याच्या अडचणी वाढल्या; डेड बॉडी बॅग प्रकरणात गुन्हा दाखल

व्यासपीठावर तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, शिवाजीराव काळुंगे, अॅड अर्जुन पाटील, दिलीप जाधव, मारुती वाकडे, अण्णासाहेब इनामदार, राहुल कोलगे, अमर सूर्यवंशी, अभिषेक कांबळे, भीमराव बालगी, महिला जिल्हाध्यक्ष डॉ. शाहीन शेख यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com