Kishori Pednekar Troubled : ठाकरे गटाच्या नेत्याच्या अडचणी वाढल्या; डेड बॉडी बॅग प्रकरणात गुन्हा दाखल

Shivsena Thackeray Group News : कोविड काळात चढ्या दराने डेड बॉडी बॅग खरेदी करण्यात अली होती. त्यामध्ये मनी लॉंड्रिंग झाल्याचा आरोप आहे.
Kishori Pednekar
Kishori PednekarSarkarnama

Mumbai News : शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांमागे लागलेले शुक्लकाष्ट साथ सोडायला तयार नाही. कारण शिवसेना नेत्यांच्या अडचणींत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. मुंबईच्या माजी महापौर तथा शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांना उच्च न्यायालयाने चार दिवसांपूर्वी अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला, असे वाटत असतानाच शनिवारी (ता. ९ सप्टेंबर) अंमलबजावणी संचालनालयाने पेडणेकर यांच्या विरोधात ‘डेड बॉडी बॅग’ प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. (Ex-Mayor Kishori Pednekar's Troubled Rise; Case has been registered in the dead body bag case)

आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या गुन्ह्याच्या धर्तीवर ECIR दाखल केला आहे. मुंबई महापालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) आणि माजी महापालिका उपायुक्त (खरेदी/सीपीडी) आणि इतर यांचीही नावे ECIR मध्ये आहेत. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kishori Pednekar
Flex war In Shiv Sena : ठाकरे गटाकडून ‘त्या’ बॅनर्सला सणसणीत उत्तर; ‘कमळाबाईची पालखी वाहण्यासाठी मी शिवसेना...’

कोविड काळात चढ्या दराने डेड बॉडी बॅग खरेदी करण्यात अली होती. त्यामध्ये मनी लॉंड्रिंग झाल्याचा आरोप आहे. या गैरव्यवहारात ४९ लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक झाल्याचा दावा ईडीने केला आहे. तसेच, ECIR दाखल केल्यानंतर ईडी लवकरच संशयित आरोपी पालिका अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे.

Kishori Pednekar
NCP News : शरद पवार गटाच्या शहराध्यक्षावर प्राणघातक हल्ला ; हल्लेखोराला नागरिकांकडून चोप

याच प्रकरणात पूर्वी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे, त्यामुळे आता या प्रकरणात ईडीकडून येत्या काळात काय पावले उचलण्यात येणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Kishori Pednekar
Mungantiwar Upset In BJP : भाजपची मुंबईत बैठक असताना मुनगंटीवार विमान पकडून चंद्रपूरला पोचले; अनुपस्थितीचे कारण आले पुढे...

कोविड महामारीच्या काळात खर्चात अनियमितता झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोविड काळात एका खासगी कंपनीने मुंबई महापालिकेला चढ्या दराने डेड बॉडी बॅग पुरविल्याचा आरोप आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com