Threat to Pune : पुण्यातील तीन ठिकाणं उडवण्याची धमकी? पुणे स्टेशन आणि भोसरी परिसरात पोलीसांची मोठी शोधमोहीम सुरू

Pune Police Alert News : शहरातील नव चैतन्य महिला मंडळ, पुणे रेल्वे स्टेशन आणि भोसरी भागात बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
bomb threat in pune
bomb threat in pune
Published on
Updated on

Pune News : शहरातील नव चैतन्य महिला मंडळ, पुणे रेल्वे स्टेशन आणि भोसरी भागात बॉम्ब ठेवल्याची धमकीने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांच्या 112 कंट्रोल रूमवर सोमवारी (ता. 19) रात्री 9 वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने फोन करून ही धमकी दिली होती. त्यानंतर पुणे पोलिस अलर्ट झाले असून याचा तपास सुरू आहे.

अज्ञात व्यक्तीने दिलेल्या धमकीनंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत मोठी शोध मोहीम सुरू केली आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसह सीआरपीएफ, रेल्वे पोलीस आणि पुणे पोलिसांच्या पथकांनी एकत्रितपणे संदिग्ध भागांत कसून तपास केला. मात्र, प्राथमिक तपासात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही.

सध्या पुणे पोलिसांकडून धमकी खोटी होती की खरी? याचा तपास सुरू आहे. कॉल करणाऱ्याची ओळख पटवण्यासाठी तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास केला जात असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

bomb threat in pune
Pune Congress: रवींद्र धंगेकर, संगीता तिवारींच्या झटक्यानंतरही पुणे काँग्रेसमध्ये 'सन्नाटा ही सन्नाटा...'

पोलिसांनी केलेला प्राथमिक तपासामध्ये हा उल्हासनगर मधील महिलेचा खोडसाळपणा असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र सध्या देशातील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चौकशी सुरू ठेवली आहे. विविध बाजूने या कॉलचा तपास पोलिसांकडून घेण्यात येत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com