Solapur Politics : सोलापुरात बीआरएसचा मोठा निर्णय; शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा

BRS Supports to NCP SP : समविचारी पक्ष म्हणून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा दिला असून, सोमवारपासून (ता. 11 नोव्हेंबर) बीआरएस प्रचारात देखील सामील होणार आहे, असे पक्षाकडून सांगण्यात आले.
Mahesh Kothe-BRS Office bearer
Mahesh Kothe-BRS Office bearerSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 10 November : विधानसभा निवडणुकीचे चित्र हळूहळू स्पष्ट होत चालले आहे. अनेकांची भूमिका, पाठिंबा निश्चित होत असून आगामी राजकीय गणिते लक्षात घेऊन अनेक जण आपली भूमिका ठरवत आहेत. सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून भाजपचे विजयकुमार देशमुख यांना आव्हान देणारे महेश कोठे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय सोलापूरच्या भारत राष्ट्र समितीने जाहीर केला आहे. बीआरएस कोठे यांच्या प्रचारातही सहभागी होणार आहे.

सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून (Solapur City North Constituency) महेश कोठे हे 2009 नंतर पुन्हा एकदा निवडणूक लढवत आहेत. या वेळीही त्यांच्यासमोर भाजपचे विजयकुमार देशमुख यांचे आव्हान असणार आहे. देशमुख हे गेल्या चार निवडणुका जिंकत आलेले आहेत. सध्याच्या निवडणुकीत दोघांमध्ये काट्याची लढत असून एका एका घटकाचा पाठिंबा महत्वाचा ठरणार आहे.

भारत राष्ट्र समितीने (BRS) महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका न लढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत. त्यानुसार सोलापूर शहरातील भारत राष्ट्र समितीने सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

Mahesh Kothe-BRS Office bearer
Uddhav Thackeray: धरण फोडणारा ‘तो’ खेकडा मध्ये घुसला अन्‌ दीपकआबांची उमेदवारी रद्द झाली; ठाकरेंचा सावंतांवर निशाणा

भारत राष्ट्र समितीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची मानसिकता लक्षात घेऊन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. समविचारी पक्ष म्हणून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा दिला असून, सोमवारपासून (ता. 11नोव्हेंबर) बीआरएस प्रचारात देखील सामील होणार आहे, असे पक्षाकडून सांगण्यात आले.

Mahesh Kothe-BRS Office bearer
Uddhav Thackeray Speech : ‘कटेंगे तो बटेंगा’ला उद्धव ठाकरेंचे खणखणीत उत्तर...‘हम महाराष्ट्र को लुटेंगे और दोस्तो को बाटेंगे’

भारत राष्ट्र समितीच्या सोलापुरातील पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका जाहीर केली आहे. बीआरएसचे शहराध्यक्ष दशरथ गोप आणि नागेश वल्याळ यांच्यासह पक्षाचे जयंत होलेपाटील, संदीप वल्याळ, व्यंकटेश आकेन, श्रीधर चिट्याल यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com