Koregaon Mahila with rakhi
Koregaon Mahila with rakhisarkarnama

Koregaon News : मुख्यमंत्र्यांना राखी पाठवून महिलांनी घातले जुन्या पेन्शनचे साकडे...

Maharashtra महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरामध्ये जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा जोर धरत आहे. सरकारी कर्मचारी गेली अनेक वर्ष जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी करत आहेत.

-पांडुरंग बर्गे

Koregaon News : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना कोरेगाव तालुक्याच्यावतीने महिला भगिनींनी मुख्यमंत्र्यांना उद्याच्या (बुधवारी) रक्षा बंधनानिमित्त राखी पाठवून जुन्या पेन्शन सुरू करण्याची मागणी करत साकडे घातले आहे. या वेळी "एकच मिशन जुनी पेन्शन" चा नारा देत महिला भगिनींनी "नको ओवाळणी, नको खाऊ, जुनीच पेन्शन हवी भाऊ" चा नारा दिला.

महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरामध्ये जुन्या पेन्शन योजनेचा Old Pension Yojana मुद्दा जोर धरत आहे. सरकारी कर्मचारी गेली अनेक वर्ष जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र Maharashtra राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने राखी अभियान आयोजित केले आहे.

या अभियानाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महिला भगिनींच्या वतीने राखी पाठवण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोरेगाव तालुका कार्यकारिणी, महिला आघाडी व सर्व पेन्शन संघटकांच्या उपस्थितीत हे अभियान पार पडले. राज्य समन्वयक बीरा लोखंडे यांनी या अभियानाचे महत्त्व स्पष्ट केले.

या वेळी "एकच मिशन जुनी पेन्शन" चा नारा देण्यात आला. महिला भगिनींनी "नको ओवाळणी, नको खाऊ, जुनीच पेन्शन हवी भाऊ" चा नारा दिला. यावेळी जिल्हा प्रतिनिधी सारिका पाटील, महिला आघाडीच्या विजया जेधे, अभिजीत राक्षे, नितीन कर्पे, अभिमान कसबे, सुरज शिलवंत, सारिका टंकसाळे, मोनाली बोधे, पुनम भुजबळ, सलमा बागबान, माधुरी वागडोळे, मयुरी राक्षे, पुष्पा काळे, मनीषा शेलार आदी उपस्थित होत्या.

Edited By Umesh Bambare

Koregaon Mahila with rakhi
Satara NCP News : शशिकांत शिंदेंची तोफ मुंबईत धडाडली; म्हणाले, जावळीकरांनो भाजपचे स्वार्थी राजकारण संपवा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com