

Solapur, 08 August : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना झोप नाहीय, आता त्यांचा फोन आला होता. आमची झालेली चूक सुधारतो म्हणालेत. तुम्ही तुमची झालेली चूक सुधारून घ्या;अन्यथा आम्ही मराठे गप्प बसणार नाही, असे आम्ही त्यांना सांगितले आहे. शिंदेसाहेबांचा फोन मी घेत नाही, त्यांच्या ओएसडीचा फोन आला होता. संजय शिरसाटांचे पावणे दोनशे मिस्ड कॉल आहेत, असे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
मनोज जरांगे पाटील यांनी लक्ष्मण हाके यांच्या बाळासाहेब भवनमधील भेटीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्यात त्यांनी निवडणुकीत कशी मदत केली होती. उद्धव ठाकरे बरे असे म्हणण्याची वेळ आमच्यावर आणू नये, असा हल्ला चढवला होता.
त्यानंतर आज खुद्द मनोज जरांगे पाटील यांनीच उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या फोनबाबत माहिती दिली. तसेच सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी तब्बल पावणे दोनशे मिस्ड कॉल केल्याचेही जरांगेंनी स्पष्ट केले.
दरम्यान, भाजप आमदार प्रसाद लाड यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांनीही फोन केल्याचे सांगितले. तसेच स्वतः लाड यांनीही तीन ते चार वेळा मनोज जरांगे पाटील यांना फोन केल्याचे जाहीरपणे सांगितले. त्यांचा गैरसमज निश्चितपणे दूर करण्यात येईल, असेही स्पष्ट केले.
जरांगे पाटील म्हणाले, भाजपला सत्तेचा माज आलाय. त्यांच्या डोक्यात एकच गेलंय, आपलं कोण काय करतं. आपण बहुमताने आलोय. ते मुस्लिमांच्या मागे लागले, त्यांना वाटलं आमचं कोणी काय करत नाही. धनगरांच्या मागे लागले त्यांना १५ वर्षे फसवलं, आता दलित बंजारा समाजाला फसवलं, शेतकऱ्यांनाही फसवलं. त्यांच्या डोक्यात आहे, आमचं कोणी काही करत नाही. मात्र आता त्यांना दाखवतो. त्यांना पळता भुई थोडी करतो.
आंदोलन मोडीत काढण्याबाबत जरांगे म्हणाले, इमानदारी विकली नाही तर फडणवीस काहीही करू शकत नाहीत. पण त्यांना माहिती नाही मनोज जरांगे आणि मराठे काहीही करू शकतात. अन्याय सहन करणारी मराठ्यांची औलाद नाही. पक्ष बिक्ष गेले उडत.
लाड, विखे पाटील काय करतील?
आमदार प्रसाद लाड, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील एकटं मरमर करून काय करील. एकटंच तडफडतंय काय करणार? अडातच नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार? मराठा, धनगर, शेतकरी सर्वांसाठी फडणवीसांची विहीरच कोरडी पडली आहे. आता मला त्यांच्या डोक्यातली कुट्टी काढायची आहे. एकही प्रमाणपत्र रद्द होऊ देणार नाही. मराठ्यांनी टेन्शन घ्यायचं नाही.
मराठ्यांनो, 29 ऑगस्टला आंतरवालीत या : जरांगे
येत्या 29 ऑगस्ट रोजीच्या आंदोलनाबाबत आवाहन करताना जरांगे पाटील म्हणाले, मराठ्यांनो घर सोडायला शिका. 29 ऑगस्टला घरासमोर एकही गाडी राहू नये. राज्यातील सर्व मराठ्यांनी आंतरवालीत या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.