Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचे मुख्यमंत्र्यांवर खळबळजनक आरोप : ‘फडणवीसांनी सगळं डाव करून बघितलं; आता शेवटचा डाव आखलाय...’

Solapur Tour News : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. फडणवीसांनी आतापर्यंत अनेक डाव खेळले असून आता शेवटचा डाव आखल्याचा दावा त्यांनी केला.
manoj jarange Patil-Devendra Fadnavis
manoj jarange Patil-Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 08 August : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळं डाव करून बघितले आहेत. आता त्यांनी शेवटचा डाव आखला आहे, असा खळबळजनक दावा जरांगे पाटील यांनी केला आहे.

सोलापूर शहरातील शिवाजी महाराजांवरील भित्तीचित्रांचे अनावरण मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत.

मराठा आरक्षणाबाबत सरकार ठंडा करके खावो, धोरण अंगीकरतंय का, असा प्रश्न विचारताच जरांगे पाटील म्हणाले, मराठे पहिले (पहिल्या सारखे) राहिले नाहीत, हे या सरकारच्या डोक्यातच येत नाही. मराठे थंड होतच नाहीत, ते कधीही गरमच आहेत. पण आता ते मोठ्या प्रमाणात चावताळले आहेत.

manoj jarange Patil-Devendra Fadnavis
Karkamb Nagar Panchayat : सोलापूर जिल्ह्यात आणखी एक नगरपंचायत होणार?; कोल्हापूर सर्किट बेंचचा ‘करकंब’बाबत महत्वपूर्ण निर्देश

सरकारने नवा डाव रचला आहे...लय भयानक आहे. आताची परिस्थिती सांगतो, चार तासांतील. मला हे रात्री कळालं होतं. आज पहाटे साडेपाचच्या सुमारास कळालं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळं डाव करून बघितले. आता त्यांनी शेवटचा डाव आखला आहे, असे जरांगे यांनी सांगितले.

manoj jarange Patil-Devendra Fadnavis
Satara Politic's : शिवेंद्रराजे-जयकुमार गोरे उधारी फेडणार? भाजपला तीनवेळा मदत करणाऱ्या राष्ट्रवादीला सातारा ZP अध्यक्षपदाची लॉटरी?

ते म्हणाले, रॅलीवर हल्ला करायचा किंवा मला अटक करायची. कुठंतरी काहीतरी दगडफेक झाली पाहिजे. आमचा रोडवरील बंदोबस्त काढायचा. आमच्यासोबत काही पत्रकार आहेत. धाराशिवच्या हद्दीपर्यंत आम्हाला रोड बंदोबस्त होता, तेथून पुढचा रोड बंदोबस्त उठवला. मला हे जे रात्री कळालं होतं, ते सकाळी यशस्वी झाल्याचे पहायला मिळाले. मी कधीच खोटी माहिती देत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com