महाबळेश्वर/ सातारा : वाधवान कुटुंबियांच्या महाबळेश्वर मधील बंगल्यावर सीबीआयने छापा टाकला असून बंगल्यातील कोट्यवधी रूपये किंमतीची परदेशी पेंडिंग्ज, पोर्टेट सील करून ताब्यात घेण्यात आली आहेत. आज दुपारी बारा वाजल्यापासून सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई सुरू केली असल्याचे सांगितले जात आहे.
महाबळेश्वर येथे पाच एकर जागेवर वाधवान यांचा बंगला असून कोरोनाच्या पहिल्या लॉकडाउनमध्ये वाधवान बंधूंनी तत्कालिन प्रधान सचिव राकेश गुप्ता यांचे विशेष पत्र घेऊन महाबळेश्वरमध्ये प्रवेश घेतला होता. तेव्हापासून वाधवान बंधू ईडीच्या ताब्यात आहेत.
सीबीआयचे अधिकारी स्थानिक पोलिसांच्या मदतीने वाधवान बंधूंच्या महाबळेश्वरच्या बंगल्या दाखल झाले आहेत. बंगल्यात असलेली परदेशी बनावटीची पेटींग्ज, पोर्टेट सील करून ती अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली असून ही कोट्यवधी किंमतीची पेंटीग्ज व पोर्टेट कोठून आणली याची माहिती घेण्यात येत आहे.
या कारवाईबाबत पोलिस व सीबीआयने गोपनियता बाळगली असून शनिवारी दुपारपासून ही कारवाई सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. बंगल्याची दोन ते अडीच तास झाडाझडती घेण्यात आली आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांच्या हाताला काय लागले याबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.