'जिहे-कठापूर'ला केंद्राकडून २४७ कोटींचा निधी...

केंद्रीय जलशक्ती Central Jalshakti Ministri मंत्रालयाने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत सामाविष्ट करत या योजनेस भरीव निधी Huge funds मंजूर करून दिला आहे.
BJP leaders
BJP leadersRushikesh Jadhav, reporter
Published on
Updated on

विसापूर : सातारा जिल्ह्याच्या पूर्वेकडील कायम दुष्काळी खटाव व माण तालुक्याची जलसंजीवनी असणाऱ्या लक्ष्मणरावजी इनामदार जिहे-कठापूर उपसा जलसिंचन योजनेचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करून केंद्राकडून २४७ कोटींचा जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या स्वाक्षरीने सहा कोटी ४८ लाख ३० हजार सहाशे पाच रुपयांचा निधी मंजूर करून हस्तांतरित केला असून उर्वरीत निधी टप्प्याटप्प्याने देण्याची तरतूद केली गेली आहे.

कृष्णा नदीतून उपसा करून १९ किलोमीटर बंद पाईपलाईन आणि ४ किलोमीटर बोगद्यातून नेर धरणात पाणी टाकून येरळा नदी यशस्वीरित्या वाहती केल्यानंतर गुरुवारी (ता. ३१) केंद्रीय जनशक्ती मंत्रालयाने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत सामाविष्ट करत या योजनेस भरीव निधी मंजूर करून दिला आहे. हा निधी मिळावा म्हणून लक्ष्मणराव इनामदार लोककल्याण ट्रस्ट, खटाव यांच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्राकडे सर्वकष प्रयत्न केले आहेत.

BJP leaders
"गुरूवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर' योजना अंतिम टप्प्यात; रेल्वे क्रॉसिंगचे काम 15 दिवसांत होणार 

त्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, भाजप प्रदेश सचिव विक्रम पावसकर, ट्रस्टचे अध्यक्ष आमदार महेश शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले. केंद्राकडून भरीव निधी प्राप्त झाल्यामुळे या योजनेला अधिक गती मिळणार आहे.

BJP leaders
ईडीच्या कारवाईनंतर ॲड उकेंच्या वडिलांचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप

या कारणामुळे खटाव-माणच्या शेतकऱ्यांनी जल्लोष केला असून सर्व लाभार्थी आणि हितचिंतकांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय जलसंसाधन मंत्री गजेंद्र शेखावत यांचे आभार मानले आहेत. तसेच लक्ष्मणराव इनामदार ट्रस्ट यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असल्याची माहिती ट्रस्टचे समन्वयक सचिव श्रीनिवास मुळे यांनी जलशक्ती मंत्रालयाच्या पत्रासह प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com