ईडीच्या कारवाईनंतर ॲड उकेंच्या वडिलांचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप

सतीश उके यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केली आहे. तब्बल 12 तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर उके यांना ईडीने अटक केली आहे. जमीन खरेदीत आर्थिक अनियमितता केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
Satish Uke &His Father
Satish Uke &His FatherSarkarnama
Published on
Updated on

नागपूर : संपूर्ण कुटुंब पाच वाजता झोपेत असताना सक्तवसुली संचानलयाचे (ईडी ED) लोक आमच्या घरी आले. माझी सून बाहेर होती. गेटमध्ये उभ्या असलेल्या सुनेला ढकलून ते आतमध्ये आले. दरवाजा उघडतानाही त्यांनी सूनेला ढकलाढकली केली. घरात आल्यानंतर ‘तुम को बहुत मस्ती आयी है. फडणवीस के खिलाफ तुम को लढना है ना?’ अशी विचारणा ईडीचे लोक करत होते, असे ॲड सतीश उके (Satish Uke) यांच्या वडिलांनी कारवाईवेळी घडलेला प्रसंग कथन केला. (You have to fight against Fadnavis, right? : ED's question to Uke)

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याविरोधात न्यायालयात खटला दाखल करणारे नागपूरचे वकील ॲड. सतीश उके यांच्या घरावर ईडीच्या पथकाने आज (ता. ३१ मार्च) पहाटे छापा टाकला. त्यावेळी घडलेली गोष्ट सतीश उके यांच्या वडिलांनी सांगितली.

Satish Uke &His Father
नीतेश राणे टायगर नसून भालू : सतीश सावंत यांची खरमरीत टीका

आम्ही संपूर्ण कुटुंब झोपत होते. त्यावेळी पहाटे पाचच्या सुमारास ईडीचे लोक आमच्या घरी आले. माझी सून त्यावेळी बाहेर होती, गेटमध्ये सूनेला ढकलून ते आत आले. दरवाजा उघडतानाही त्यांनी सूनेलाही ढकलाढकली केली. घरात आल्यानंतर ईडीच्या लोकांनी आमचे फोन काढून घेतले. आम्हाला एक कोपऱ्यात बसवले. इकडे तिकडे कुठेही जायचे नाही. फक्त तुम्ही बाथरुमला जाऊ शकता, असे त्यांनी आम्हाला सांगितले. त्यामुळे आम्ही झोपेतून उठून अंथरुणात बसून राहिलो, असेही त्यांनी सांगितले.

Satish Uke &His Father
सतीश उकेंविरूद्ध जमिनी बळकाविण्यासह इतर गुन्हे दाखल…

घरात आल्यानंतर ईडीचे लोक म्हणत होते की, ‘तुम को बहुत मस्ती आयी है. फडणवीस के खिलाफ तुम को लढना है ना?’ असे म्हणत सतीश उके यांच्या वडिलांनी ‘ही कारवाई देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावरून होत आहे’ असा आरोपही उके यांच्या वडिलांनी केला. ते पुढे म्हणाले की, ईडीच्या लोकांनी मलाही धमकावले. ते मला म्हणाले की, ‘आप बच्चो को समझाते नही क्या. ठीक है देखते है कसे तुम हे करते हो.’

Satish Uke &His Father
'...तर राज्यातील जनता ॲड. गुणरत्न सदावर्तेंना डोक्यावर घेऊन नाचेल'

सतीश उके यांच्यावर दोन ते तीन वेळा हल्लाही झाला आहे. सरकारने या प्रकरणात लक्ष घालून आम्हाला न्याय मिळवून द्यावा. देवेंद्र फडणवीस यांनी आमच्यावर अनेकदा हल्ले केले आहेत. आमच्या विरोधात खोट्या केसेस दाखल केल्या आहेत, अशी मागणी ॲड सतीश उके यांच्या वडिलांनी केली.

Satish Uke &His Father
भरणेंकडून हर्षवर्धन पाटलांना धक्क्यावर धक्के : आक्रमक युवा नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश!

ईडीच्या हाती महत्त्वाची कागदपत्रं

दरम्यान, सतीश उके यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केली आहे. तब्बल 12 तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर सतीश उके यांना ईडीने अटक केली आहे. जमीन खरेदीत आर्थिक अनियमितता केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. आज सकाळी ईडीचे अधिकारी वकिलाच्या घरी पोचले. छापेमारीत काही महत्त्वाची कागदपत्रं ईडीच्या हाती लागल्याची सूत्रांची माहिती या कागदपत्रांच्या चौकशीनंतर ईडीने ही अटक केली. सतीश उके यांना उद्या (ता. १ एप्रिल) मुंबईत आणलं जाणार असून ईडी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com