खेवरेंचे खासदार लोखंडे यांना आव्हान : हिंमत असेल तर नगर जिल्ह्याच्या उत्तरेत बैठका घ्या...

शिवसेनेचे ( Shivsena ) उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी शिंदे गटातील खासदार सदाशिव लोखंडे यांना आव्हान दिले.
Sadashiv Lokhande
Sadashiv LokhandeSarkarnama
Published on
Updated on

Shivsena : शिवसेनेच्या शिंदे गटात गेलेले सदाशिव लोखंडे हे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार असताना ते अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात फिरत आहेत. अहमदनगरमध्ये गाठी भेटी घेत आहेत. हिंमत असेल तर त्यांनी जिल्ह्याच्या उत्तरेत बैठका घ्याव्यात, असे आव्हान शिवसेनेचे ( Shivsena ) उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी त्यांना दिले.

शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार लोखंडे व जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेच्या ठाकरे गटावर टीका केली होती. या टीकेला शिवसेनेचे दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे व उत्तर जिल्हा प्रमुख खेवरे यांनी उत्तर दिले. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम, उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव, महापौर रोहिणी शेंडगे, विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, कामगार सेनेचे सुरेश क्षीरसागर यांसह 18 नगरसेवक उपस्थित होते.

Sadashiv Lokhande
संतप्त शिवसैनिकाचा खासदार लोखंडेंना सवाल : माझ्या मताचा सौदा केवढ्याला केला?

खेवरे म्हणाले, 2014 मध्ये खासदार लोखंडे यांना 80 टक्के मतदारांनी पाहिलेही नव्हते. पक्ष व चिन्हाच्या जोरावर ते निवडून आले. 2019 मध्ये ते निष्क्रीय खासदार असल्याची जनतेची तक्रार होती. मात्र ठाकरे यांनी त्यांना उमेदवारी दिली. कर्तृत्व नसताना ते शिवसेनेच्या जोरावर खासदार झाले. खोक्यांच्या नादी लागून ते शिंदे गटात गेले आहेत. आज ते शिंदे गटात दिसत असले, तरी उद्या ते भाजपत जाणार. ते कोणत्याही पक्षात गेले, तरी ते निवडून येणार नाहीत.

Sadashiv Lokhande
खासदार सदाशिव लोखंडेंच्या कुंडलीत पुन्हा राजयोग?

बबनराव घोलपच उमेदवार

खासदार लोखंडे यांच्या जागी शिवसेना कोणता पर्याय देणार, असे खेवरे यांना विचारले असता त्यांनी, बबनराव घोलप हेच शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार असतील, असे स्पष्ट केले.

त्या नगरसेवकांची नावे जाहीर करा

शिवसेनेचे 8 ते 10 नगरसेवक लवकरच शिंदे गटात येतील, असे अनिल शिंदे यांनी सांगितले होते. यावर शशिकांत गाडे यांनी अनिल शिंदेंना त्या नगरसेवकांची नावे जाहीर करण्याचे आव्हान दिले. शिंदे हे खोट्या बातम्या पसरविण्याचे काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचा होणारा दसरा मेळावा 56 वर्षांचा विक्रम मोडणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com