Chandgad Assembly : बंडखोरांमुळे महायुती अन् महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा 'गेम' होणार?

Maharashtra Assembly Election 2024 : चंदगड मधील महायुतीचे संभाव्य उमेदवार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आमदार राजेश पाटील आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील या प्रकारावर नाराजी व्यक्त केली.
Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Assembly Election 2024 Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: कोल्हापुरातील चंदगड विधानसभा मतदारसंघ जिल्ह्याच्या राजकीय पटलावर चर्चेचा विषय ठरत आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी चंदगडमध्ये मेळावा घेत शिवाजीराव पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर महायुतीमध्ये पडलेली ठिणगी जिल्ह्याच्या राजकारणात कारणीभूत ठरत आहे. चंदगड मधील महायुतीचे संभाव्य उमेदवार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आमदार राजेश पाटील आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. एकूणच शिवाजीराव पाटील यांची अपक्ष बंडखोरी अटळ समजली जाते.

तर दुसरीकडे महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संभाव्य उमेदवार डॉ. नंदिनीताई बाभुळकर यांच्या मार्गातील अडथळा दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी होणाऱ्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बाभुळकर -कुपेकर यांनाच निमंत्रित न केल्याने महाविकास आघाडीमध्ये देखील बंडाळी मागण्याची शक्यता आहे.

चंदगड विधानसभा मतदारसंघात (Chandgad Vidhansabha Constituency) आमदार राजेश पाटील, भाजपचे शिवाजीराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) डॉ. नंदिनी बाभूळकर व अथर्व इंटरट्रेड कंपनीचे अध्यक्ष मानसिंग खोराटे अशी चौरंगी लढत निश्चित मानली जाते. तर शिवसेना ठाकरे गटाकडून जिल्हाध्यक्ष सुनील शिंत्रे, काँग्रेस नेते गोपाळराव पाटील, आप्पी पाटील हे देखील इच्छुक आहेत.

गेल्या दोन महिन्यांपासून आमदार राजेश पाटील यांच्यासोबत शिवाजीराव पाटील, मानसिंग खोराटे, नंदाताई बाभुळकर, यांनी सभांचा धडाका सुरू केला आहे. त्यावर होणारा खर्च पाहता अपक्ष गृहीत धरूनच निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे दिसून येते. मात्र याचा फायदा कोणाच्या पथ्यावर पडणार आणि लाभ-तोटा होणार हे येणाऱ्या काळात निश्‍चित होईल.

Maharashtra Assembly Election 2024
Ichalkaranji Constituency Politics : आवाडे-हळवणकरांच्या मनोमिलनाने भाजप सुसाट; मात्र स्वकीय डोकेदुखी वाढवणार

महायुतीचे उमेदवार म्हणून आमदार राजेश पाटील (Rajesh Patil) यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि भाजपचे नेते शिवाजीराव पाटील (Shivaji Patil) यांनी देखील मैदानात शब्द ठोकला आहे. त्याही परिस्थितीत माघार नाही हेच चित्र मतदारसंघात आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जाहीरपणे त्यांच्या उमेदवारीला पाठबळ देण्यासाठी आले असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री सावंत यांनी थेट पाटील यांची उमेदवारी घोषित करून महायुतीच्या नेत्यांनाच आव्हान दिले आहे. या संपूर्ण प्रकारामुळे आमदार राजेश पाटील आणि हसन मुश्रीफ यांची नाराजी दिसून आली.

Maharashtra Assembly Election 2024
Ahilyanagar : CM एकनाथ शिंदेंना घरचा आहेर, प्रस्थापितांच्या मुद्यावरून माजी खासदारानं डागली तोफ

महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) या मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून डॉक्टर नंदाताई बाभुळकर त्यांची उमेदवारी निश्चित मानले जाते. गेल्या महिनाभरापासून त्यांनी मतदारसंघात अनेक प्रचार दौरे मिळावे करत आपली मोट बांधली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस मधील असलेले इच्छुक यांनी बाबुळकर यांना विरोध केला आहे. रविवारी महाविकास आघाडी कडून मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला कुपेकर आणि बाभुळकर यांना निमंत्रित करण्यात आले नाही. त्यामुळे अंतर्गत गटबाजी महाविकास आघाडीला धोकादायक ठरेल अशीच भीती या मतदारसंघात व्यक्त केली जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com