Ahilyanagar : CM एकनाथ शिंदेंना घरचा आहेर, प्रस्थापितांच्या मुद्यावरून माजी खासदारानं डागली तोफ

Former Shiv Sena MP Sadashiv Lokhande: माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करणारा किस्सा सांगितला.
MP Sadashiv Lokhande
MP Sadashiv LokhandeSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News : प्रस्थापितांशी संघर्ष करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांच्या मागं उभे राहत नाही, असा खळबळजनक किस्सा सांगून माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी आपल्याच पक्षाच्या नेत्याला अडचणीत आणलं आहे.

यातून प्रस्थापितांमुळे शिर्डीत काम करता आले नसल्याची खंत व्यक्त करताना, त्याचे खापर भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखेंवरही सदाशिव लोखंडे यांनी फोडलं. सदाशिव लोखंडे यांनी ही नाराजी ऐन विधानसभा निवडणुकीत व्यक्त केल्यानं महायुतीत मीठाचा खडा पडला आहे.

श्रीरामपूरमध्ये शिवसेनेचा मेळावा झाला. या मेळाव्यात माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी प्रस्थापितांवर तोफ डागली. एकप्रकारे त्यांनी भाजप (BJP) नेते मंत्री पालकमंत्री विखेंना टार्गेट केलं. प्रस्थापितांमुळे काम कसे करता येत नाही, याची तक्रार थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केल्याचंही सदाशिव लोखंडे यांनी सांगितलं. यावर मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांच्या पाठिशी उभे राहत नसल्याची खंतही सदाशिव लोखंडे यांनी व्यक्त केली.

MP Sadashiv Lokhande
Vikhe Vs Thorat : 'मुख्यमंत्री काय यंदा आमदार सुध्दा होणार नाहीत!' विखेंची थोरातांच्या बालेकिल्ल्यातच तोफ धडाडली

माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिर्डी (Shirdi) राखीव मतदार संघ आहे. या तालुक्यात प्रस्थापित नेत्यांना विचारल्याशिवाय काहीही काम करता आले नाही, असे सांगत, ही खंत मुख्यमंत्र्याना बोलून दाखवली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांशी संबंध व्यवस्थित ठेवा, असा सल्ला दिला. यावर आपण एका हाताने टाळी वाजत नाही, असे सांगून त्यांनीही आमच्याशी जुळवून घेतले पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांना सांगितलं.

MP Sadashiv Lokhande
Eknath Shinde : आघाडीने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवण्याऐवजी विरोधी पक्षनेता ठरवावा; मुख्यमंत्री शिंदेंनी लगावला टोला

'श्रीरामपूर जिल्हा होण्याची मागणी लावून धरणार आहे. तसंच मुळा-प्रवरा वीज संस्था पुन्हा चालू करू. 2005 चा समन्यायी पाणीवाटप हा काळा कायदा पारित झाला, त्यावेळी या परिसरातील नेते विधानसभेत झोपले होते का?', असा सवालही सदाशिव लोखंडे यांनी केला.

योजना लोकांपर्यंत पोचवा

शिवसेनेचे पक्ष निरीक्षक राजेंद्र चौधरी यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील परिस्थिती वेगळी असली, तरी महायुती म्हणून निवडणूक लढायची आहे. युती धर्म पाळायचा आहे. मुख्यमंत्र्यांनी राबवलेल्या योजना लोकांपर्यंत नेण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे. पक्षाची शिस्त सर्वांना पाळावी लागणार आहे, असे सांगितले.

कार्यकर्त्यांची खंत, चौधरींची सावरासावर

"लोकसभेत आपल्याबाबत अपप्रचार केला गेला. 10 वर्षे खासदार होतात. परंतु पराभव झाला. त्याची वेगवेगळी कारणे असून युतीतच निवडणूक लढायची आहे. संघटनात्मक पातळीवर आपल्या जिल्ह्याबाबत काही तक्रारी असून विधानसभा निवडणूक उमेदवारीबद्दल ज्या सूचना केल्या, त्या वरिष्ठांच्या कानावर घालू. खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घालून देऊन तुमची खंत मुख्यमंत्र्यांपुढे मांडायची संधी उपलब्ध करून देऊ", असे आश्वासन राजेंद्र चौधरी यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com