Sujay Vikhe News : विखे-पाचपुतेंची मागणी चंद्रकांतदादांनी केली पूर्ण; 'कुकडी' आवर्तनाच्या मुदतीत वाढ

Chandrakant Patil : विसापूरलाही पाणी वळविण्‍याच्‍या सूचना
Babanrao Pachpute, Sujay Vikhe, Chandrakant Patil
Babanrao Pachpute, Sujay Vikhe, Chandrakant PatilSarkarnama
Published on: 
Updated on: 

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar Political News : कुकडी डाव्‍या कालव्‍यातून उन्‍हाळी हंगामासाठी सुरु आहे. या आवर्तनाची मुदत श्रीगोंदा तालुक्‍यातील शेतकऱ्यांची पाण्‍याची गरज जास्त होती. ती लक्षात घेवून आवर्तनाची मुदत तीन दिवस वाढविण्‍यात आली आहे. यावेळी विसापूरलाही पाणी वळविण्‍याचा महत्‍वपूर्ण निर्णय झाला आहे. याबाबत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी माहिती दिली. (Latest Marathi News)

या आवर्तानाचा कालावधी वाढवण्यासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांनी पुढाकार घेतला होता. त्यांनी पुणे जिल्‍ह्याचे पालकंमंत्री चंद्रकांत पाटील यांच्‍याशी संपर्क साधला. पाटील यांच्याकडे त्यांनी आवर्तनाचा कालावधी वाढवण्याची विनंती केली होती. त्यानंतर तीन दिवसांची मुदतवाढ करण्यात आली आहे. दरम्यान, पावसाने ओढ दिली आहे. त्यात झालेल्या या निर्णयामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Babanrao Pachpute, Sujay Vikhe, Chandrakant Patil
Ajit Pawar News : राष्ट्रवादीत पुन्हा भाकरी फिरणार! अजित पवार प्रदेशाध्यक्ष तर जयंत पाटलांकडे जाणार 'हे' पद?

याबाबत कुकडी कालवा सल्‍लागार समितीमध्‍ये सहा दिवसांचे आवर्तन देण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला होता. परंतू श्रीगोंदा तालुक्‍यात शेतकऱ्यांना असलेली पाण्‍याची गरज लक्षात घेता या कमी कालावधी कमी होता. या कमी कालावधीच्या आवर्तनामुळे सिंचन पूर्ण होणे शक्‍य नव्‍हते. ही बाब मंत्री चंद्रकांत पाटील तसेच नगर जिल्‍ह्याचे पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या निदर्शनास आणून देण्‍यात आली होती.

Babanrao Pachpute, Sujay Vikhe, Chandrakant Patil
Photo Of Fadnavis On Aadhar Card: आठ वर्षाच्या मुलाच्या आधार कार्डावर चक्कं फडणवीसांचा फोटो; शाळेत प्रवेशही घेतला..

दरम्यान, आवर्तनाचा कालावधी आता ९ दिवसांचा झाला आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी मिळाले आहे. यापेक्षाही महत्‍वाचे म्‍हणजे श्रीगोंदा तालुक्‍यातील विसापूरलाही पाणी वळविण्‍याच्‍या सूचना आधिकाऱ्यांना दिल्यचेही खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार बबनराव पाचपुते यांनी यावेळी सांगितले. या निर्णयामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.