
जिल्ह्यात ज्या पक्षाच्या सर्वाधिक जागा त्या पक्षाला पालकमंत्री पद जाते. असेच आजपर्यंतच्या इतिहासात जिल्ह्याचे सूत्र राहिले आहे. या सूत्राप्रमाणे राजकीय गणित ठरल्यास जिल्ह्याचे पालकमंत्री पद मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या नावावर कोल्हापूरचे पालकमंत्री पदासाठी शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तर मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी येण्याची शक्यता आहे.
कोल्हापूरच्या पालकमंत्री पदासाठी मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यासाठी कोल्हापुरातील पदाधिकाऱ्यांनी आग्रह धरला आहे. मात्र सोलापूर जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार असूनही मंत्रीपद दिले नसल्याने पुन्हा सोलापूरची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्यावर येण्याची शक्यता आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसच्या चार आणि राष्ट्रवादीच्या दोन जागा निवडून आल्यानंतर पालकमंत्री पदासाठी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात आमदार सतेज पाटील आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्यात स्पर्धा लागली होती. मात्र
जिल्ह्यात काँग्रेसचे चार आमदार असल्याने पालकमंत्री पदावर सतेज पाटील (Satej Patil) यांची वर्णी लागली. राज्याच्या इतिहासात हेच सूत्र कायम चालत आले आहे. अडीच वर्षानंतर झालेल्या सत्ता बदलात महायुतीच्या काळात पालकमंत्री पद हसन मुश्रीफ यांच्याकडे आले. महायुतीमध्ये त्यावेळी शिवसेनेचा एक, जनसुराज्यचा एक आणि राष्ट्रवादीचे दोन आमदार असल्याने हे पद मुश्रीफ यांच्याकडे गेले.
या सूत्रानुसार द्यायचे ठरल्यास जिल्ह्यात या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या घटक पक्षाचे यड्रावकर यांच्यासह चार आमदार आहेत. जिल्ह्यातून कॅबिनेट मंत्रीपदावर अबिटकर (Prakash Abitkar) यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या नावावर कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्याला महायुती सरकारकडून अद्याप मंत्रीपदावर निश्चिती नाही. भौगोलिक परिस्थिती पाहता सांगली आणि कोल्हापूरचे राजकीय संबंध अधिक जवळचे आहेत. त्यामुळे मुश्रीफ यांना सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची माळ गळ्यात पडू शकते.
पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि कोल्हापूरचे पुत्र चंद्रकांत पाटील यांचे देखील कॅबिनेट मंत्रीपदावर निवड झाली आहे. 2014 ते 19 च्या कार्यकाळात त्यांनी कोल्हापूरच्या पालकमंत्री पदाची धुरा सांभाळली आहे. गेल्या दहा वर्षापासून त्यांची कोल्हापूरची राजकीय नाळ तुटल्याने कार्यकर्त्यांची कमी संपर्क आहे. मात्र हा संपर्क पुन्हा जोडण्यासाठी कार्यकर्त्यांनी कोल्हापूरच्या पालकमंत्री पदासाठी चंद्रकांत पाटील यांचे नाव सुचवले आहे. त्यासाठी ते आग्रही आहेत. मात्र हे पालकमंत्री पद पाटील यांना मिळेल याची शक्यता कमी आहे. येत्या दोन दिवसात खातेवाटप जाहीर होईल. त्यानंतरच हा निर्णय होणे अपेक्षित आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.