NCP Ajit Pawar Group : अजित पवार गटाच्या महाराष्ट्र प्रदेशच्या सरचिटणीसपदी लतिफ तांबोळी यांची नियुक्ती

Latif Tamboli News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवण्याचा धडाका अजितदादांनी लावला आहे.
Solapur NCP
Solapur NCP Sarkarnama
Published on
Updated on

Mangalwedha News : आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गटदेखील अॅक्शन मोडवर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील शहरासह ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवण्याचा धडाका अजितदादांनी लावला आहे.

आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या महाराष्ट्र प्रदेशच्या सरचिटणीसपदी मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथील लतिफ तांबोळी यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले. या वेळी माजी आमदार दीपक साळुंखे उमेश पाटील आदी उपस्थित होते.

Solapur NCP
Ajit Pawar News : मुंबईसाठी अजितदादांचा मोठा निर्णय; दोन बड्या नेत्यांवर सोपवली 'ही' जबाबदारी

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर त्यांनी अजित पवार गटाची पताका सगळ्यात आदी हाती घेतली. यानंतर त्यांचे नाव जिल्हाध्यक्ष पदासाठी चर्चेत होते. त्या पदावर माजी आमदार दीपक साळुंके यांना संधी देत तांबोळी यांना राज्य कार्यकारिणीत स्थान दिले.

यापूर्वी तांबोळी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभाग प्रदेश उपाध्यक्ष, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयीन सचिव म्हणूनदेखील काम पाहिले. आता त्यांच्या कार्याची दखल घेत तांबोळी यांची प्रदेश सरचिटणीसपदी निवड करण्यात आली.

दरम्यान, "पक्षवाढीसाठी व पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहाेचविण्यासाठी पक्षाला पूर्णपणे मदत करणार असून, आगामी निवडणुकीत पक्षाची ताकद दाखवून दिली जाईल, तसेच वरिष्ठांनी टाकलेल्या जबाबदारीचे सार्थक केले जाईल, असे निवडीनंतर 'सरकारनामा'शी बोलताना तांबोळी यांनी सांगितले.

Edited by Ganesh Thombare

Solapur NCP
Rohini Khadse On Wagh : खासदार सुळेंवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक; रोहिणी खडसेंनी घेतली चित्रा वाघांची शाळा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com