
Violence in Kolhapur : कोल्हापुरात दोन दिवसांपासून तणाव निर्माण झाली आहे. औरंगजेबाचे फोटो तरुणांनी व्हॉट्स अॅप स्टेटसला ठेवल्याने कोल्हापुरात राडा झाला. यामुळे हिंदुत्त्ववादी संघटनांनी रस्त्यावर उतरून आंदोलनही केले. बुधवारी शहरात कडकडीत बंद ठेवण्यात आला होता. या सर्व पार्श्वभूमीवर छत्रपती शाहू महाराज यांनी माध्यमांशी संवाद साधला.
कोल्हापूर व आजूबाजूची गाव अशांत आहेत. या सर्व पार्श्वभूमीर येथील पोलीस (Police) यंत्रणा कमी पडली का? या प्रश्नावर छत्रपती शाहू महाराज (Chhatrapati Shahu Maharaj) म्हणाले की, ''आता झाले ते झाले. ते बदलता येणार नाही. मात्र, यापुढे पोलिसांनी सतर्क रहावे. सीआयडीसारख्या ज्या यंत्रणा आहे त्यांना अधिक सक्रिय करावे.''
''कोल्हापुरात (Kolhapur) बुधवारी घडलेला प्रकार कधीच घडला नव्हता. माझे बोलणे झाले. कालच सांगितले होते काही असले तर मला बोलवा. दोन्ही समाजात सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीकोनातून माझा काही उपयोग होत असेल तर करु'' असे छत्रपती शाहू महाराज म्हणाले.
दरम्यान, कोल्हापूर आणि जिल्ह्यातील परिस्थिती बुधवारी दुपारपासून पूर्ववत झाली. ४ एसपीआरएफच्या तुकड्या, ३०० पोलीस, ६० पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत, ''औरंगजेबाचे व्हॉटसअॅपला स्टेटस ठेवले असल्याचा प्रकार उजेडात आल्यानंतर पोलीस खाते तत्काळ सक्रिय झाले. मंगळवारपासूनच संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहेत. काही गावं बंद करण्याचे आवाहन करण्यात आले होते, अशी माहिती कोल्हापूर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.