Kolhapur Police : पोलिसांमध्ये पायताणाची मोठी दहशत; कोरटकरमुळे कोल्हापुरकरांवर आली अनवाणी फिरण्याची वेळ

Prashant Kortakar arrest news : छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेनंतर आता त्याला कोल्हापुरातील शिवप्रेमींची भीती वाटत आहे. शिवप्रेमींसह त्यांच्या कोल्हापुरी पायताणाची भीती देखील त्याला लागून राहिलेली आहे.
Prashant Kortakar arrest Kolhapur Police
Prashant Kortakar arrest Kolhapur PoliceSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 29 Mar : छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला (Prashant Kortakar) कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेनंतर आता त्याला कोल्हापुरातील शिवप्रेमींची भीती वाटत आहे. शिवप्रेमींसह त्यांच्या कोल्हापुरी पायताणाची भीती देखील त्याला लागून राहिलेली आहे.

कारण कोरटकरला पोलिसांकडून (Police) कडेकोट बंदोबस्तात न्यायालयात नेलं आणि आणलं जात आहे. मात्र, त्याला न्यायालयात घेऊन जाताना पोलिसांना कोरटकरच्या सुरक्षेसह शिवप्रेमींच्या पायताणाकडे देखील लक्ष द्यावं लागत आहे. कारण कोण कधी कोणत्या ठिकाणाहून पायताण भिरकावून मारेल याचा अंदाज नसल्याने न्यायालयाच्या आवारातच पायतान दिसताच ते जमा करण्याचे सत्र पोलिसांनी सुरू केलं आहे.

महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं प्रेरणास्थान असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपमानास्पद वक्तव्य केल्यानंतर प्रशांत कोरटकर विरोधात शिवप्रेमींच्या भावना संतप्त झाल्या आहेत. महिनाभर पोलिसांना गुंगारा दिल्यानंतर अखेर कोल्हापूर (Kolhapur) पोलिसांनी त्याला अटक केली. कोल्हापुरात आणताच जुना राजवाडा पोलिस ठाण्यासमोर शिवप्रेमी कोल्हापूरी पायताण घेऊन दाखल झाले होते.

Prashant Kortakar arrest Kolhapur Police
Chhagan Bhujbal : भाऊसाहेब हिरे अन् स्वातंत्र्यवीर सावरकर दोघांचंही नाव नको; नाशिक उपकेंद्र नावाच्या वादावर भुजबळांचं स्पष्टीकरण

कोल्हापुरी पायताणाचा हिसका दाखवण्याचा इशारा दिल्यानंतर सुरक्षा म्हणून आता कोल्हापूरच्या पोलिसांची नजर शिवप्रेमींच्या पायताणाकडे लागून राहिली आहे. कोरटकरला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केलं त्या दिवशी उपस्थित असणाऱ्या हर्षल सुर्वे यासह अन्य पदाधिकाऱ्यांची कोल्हापुरी पायताण पोलिसांनी जमा केले होते.

कोरटकरला 28 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्यानंतर त्याला पोलिस कोर्टातून घेऊन गेल्यानंतरच सुर्वे यांना त्यांचे पायताण परत देण्यात आले. तर 28 मार्चची पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर पुन्हा कोरटकरला न्यायालयात नेण्यात आले होते.

Prashant Kortakar arrest Kolhapur Police
Myanmar Earthquake : गृहयुद्धात अडकलेल्या म्यानमारवर निसर्गाची अवकृपा! विनाशकारी भूकंपात 700 जणांचा बळी, उंच इमारती कोसळल्याचे भयंकर VIDEO व्हायरल

यावेळी मात्र पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. न्यायालयाला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. प्रवेशद्वारावरच येणाऱ्या आणि जाणाऱ्यांची चौकशी केली जात होती. शिवाय कोर्ट कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांच्या पायात पायताण दिसताच ते जमा करण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात येत होत्या.

त्यामुळे जमा केलेल्या पायताणाचा ढीग तयार झाला होता. याची चर्चा देखील चांगलीच रंगली होती. मात्र, संपूर्ण या प्रकाराचा सर्वसामान्य नागरिकांना फटका बसल्याचं पाहायला मिळालं. कारण अनेकांवर भर उन्हात कोर्टात अनवाणी पायाने जायची वेळ आली.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com