Badlapur News: बदलापूर येथे झालेल्या लहान मुलींवरील अत्याचार प्रकरणाबाबत राज्य सरकारने आता कडक पावले उचलायला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत जिल्हा आणि पोलीस प्रशासनासह शैक्षणिक विभागाला कडक निर्देश दिले आहेत.
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आज कोल्हापूर (Kolhapur) दौऱ्यावर आल्या आहेत. त्यांना तात्काळ बदलापूर येथे जाण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत. याबाबत योग्य ती भूमिका मांडत परिस्थिती हाताळण्याबाबत योग्य ते निर्देश गोऱ्हे यांना फोनवरून मुख्यमंत्री शिंदे (Eknath shinde) यांनी दिले आहेत. त्याबाबतची माहिती गोऱ्हे यांनी पत्रकारांना दिली आहे.
या घटनेबाबत बोलताना नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी, पालकांनी आणि नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये. कायद्याच्या चौकटीत राहूनच लवकरात लवकर गुन्हेगारांना कशी शिक्षा देता येईल हे पाहणे महत्त्वाचे असते. संबंधित खटला जलद गतीने फास्ट कोर्टात चालवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील राहील. संबंधित संशयित गुन्हेगारांना फाशी लवकरात लवकर कशी देता येईल यासाठी प्रयत्न केला जाईल. अशी ग्वाही गोऱ्हे यांनी दिली आहे.
दरम्यान या घटनेबाबत नीलम गोऱ्हे यांनी पोलिसांवर देखील ताशेरे ओढले. महिला पोलीस अधिकारी असून या घटनेचा गुन्हा नोंद करायला उशीर का लागला? असा सवाल गोऱ्हे यांनी केला आहे. आज बदलापूर येथे पोहचून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेणार असून त्याचा अहवाल लवकरात लवकर राज्य सरकारला सुपूर्द करणार असल्याची माहिती नीलम गोऱ्हे यांनी दिली.
दरम्यान, या घटनेनंतर कायदा आणि सुव्यवस्था निर्माण झाली आहे. अशी टीका राज्य सरकारवर विरोधकांनी केली आहे. त्याला उत्तर देताना गोऱ्हे यांनी, कोणी गुंडाना सोबत घेतले आहे हे मला माहिती नाही. गुंडांनी मंत्र्यांना सोबत घेतले का मंत्र्यांनी गुंडाला सोबत घेतले.
नयना सहानी, जळगाव हत्याकांड बाबत विरोधक त्यावेळी शांत होते. या घटना त्यावेळी काँग्रेसच्याच सरकार असतांना राज्यात झाल्या आहेत. आपलं ते बाब्या आणि दुसऱ्याच ते कार्टं अशा पद्धतीचे राजकारण महिलांच्या प्रश्नात आणू नये. पोलिसांचा वचक राहिलेला नाही, अशा शब्दात गोऱ्हे यांनी विरोधकांना सुनावले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.