Rohit Pawar News : शेतकऱ्यांसाठी शरद पवारांनी काय केले हे मुख्यमंत्र्यांनी अजितदादांना विचारावे : रोहित पवारांचा टोला

Rohit Pawar आमदार रोहित पवार कोल्हापूर दौऱ्यावर जाण्यापुर्वी कराड येथे काहीकाळ थांबुन पत्रकारांशी संवाद साधला.
Rohit Pawar, Ajit Pawar, Eknath Shinde
Rohit Pawar, Ajit Pawar, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Karad NCP News : शेतकऱ्यांच्या कांद्याचा प्रश्न सोडवायचा सोडुन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री या तिघांनी वेगवेगळ्या पध्दतीने श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. केंद्राने नाफेडकडून कांदा खरेदीचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याचे सांगितले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केंद्रातील नेत्यांची वाहवा करताना मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांनी कधीही असा निर्णय घेतला नाही असे सांगितले. त्यावेळी शेजारी बसलेल्या अजितदादांना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले ते विचारायला पाहिजे होते, असा टोला आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मारला.

आमदार रोहित पवार Rohit Pawar कोल्हापूर दौऱ्यावर जाण्यापुर्वी कराड Karad येथे काहीकाळ थांबुन पत्रकारांशी संवाद साधला. माजी नगरसेवक सौरभ पाटील, समीर कुडची, संजय पिसाळ यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. महाशक्तीच्या विरोधात आज आम्ही लढत आहोत. पवारसाहेबांचा संदेश घेवुन कोल्हापुरला चाललो आहे, असे त्यांनी सांगितले.

पवार म्हणाले, कांदा निर्यातीचा घेतलेला निर्णय व त्यावर लावलेला निर्यात शुल्क हा घाईगडबडीमध्ये घेतलेला निर्णय आहे. राज्य सरकारमध्ये क्रेडिट घेण्यासाठी सर्वच पुढारी धडपडत आहेत. हे सरकार एक आहे असे सर्वजण म्हणतात. परंतु तिन्ही पक्षांचे चेहरे वेगवेगळ्या दिशेला आहेत.

केंद्राने कांदा निर्यातीवर बंदी आणल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होईल. महाराष्ट्रात प्रामुख्याने नाशिकमध्ये जेव्हा कांद्यावरून शेतकरी आक्रमक झाले तेव्हा राज्याचे कृषिमंत्री केंद्रीय मंत्र्यांना भेटायला गेले. जपानमधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोनवेळा केंद्रीय मंत्र्यांना फोन केले. मग मुख्यमंत्र्यांचा कृषीमंत्र्यांवर विश्वास नाही असे स्पष्ट होते.

Rohit Pawar, Ajit Pawar, Eknath Shinde
Satara Congress News : कॉंग्रेस वर्किंग कमिटीतही डावलले; पृथ्वीराज चव्हाणांचे दिल्लीतील वजन घटलं?

पत्रकार परिषद घेताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या शेजारीच बसले होते. मुख्यमंत्र्यांनी केंद्रातील नेत्यांना बरे वाटावे म्हणून त्यांची वाहवा केली. केंद्रातील नेत्यांची वाहवा करताना शरद पवार साहेबांनी कधीही असा निर्णय घेतला नाही असे म्हटले. तेव्हा शेजारी बसलेल्या अजितदादांना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले आहे हे विचारायला पाहिजे होते.

ते म्हणाले, दोन लाख टन नाफेड कडून कांदा खरेदी करून काही उपयोग होणार नाही. केवळ बातम्या होतील कार्यकर्त्यांना बोलायला संधी मिळेल, वातावरण निर्माण करतील. परंतु आत्ता नाफेकडे तीन लाख टन कांदा आहे तो विकणार असल्याचे म्हणत आहेत. तेव्हा दोन लाख टन खरेदी करणार आणि तीन लाख विकणार अशावेळी मार्केटची परिस्थिती काय होणार याचा अभ्यास त्यांनी केला आहे का ? सरकारला शेतकऱ्यांच्या अडचणी कळतात का ? केंद्रातील नेत्यांचे वाहवा करण्याच्या ऐवजी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे.

Edited By : Umesh Bambare

Rohit Pawar, Ajit Pawar, Eknath Shinde
Ajit Pawar On Sharad Pawar : शरद पवारांपेक्षा आम्ही वेगळी भूमिका घेतलीय, असं दाखवण्याचं..; भाजपसोबतच्या युतीवर अजितदादा म्हणाले,..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com