Satara : मुख्यमंत्री करतात १८ तास काम.. महाराष्ट्राला देशात नंबर एक बनविणार...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी CM Eknath Shinde सांगितले आहे की, ही आराम करण्याची वेळ नाही, आपल्याला लोकांसाठी काम करायचे आहे, असेही मंत्री देसाई Shambhuraj Desai म्हणाले.
Eknath shinde, Shambhuraj Desai
Eknath shinde, Shambhuraj Desaisarkarnama

सातारा : राज्याचे मुख्यमंत्री १८ तास काम करत असून आम्ही त्यांचे सहकारी मंत्रीही तेवढ्यात वेगाने पळून त्यांच्या बरोबरीने व जबाबदारीने काम करत आहेत. आगामी काळात महाराष्ट्राला देशात क्रमांक एकचे राज्य करण्याचा निर्णय आम्ही शिंदे-फडणवीसांच्या नेतृत्वाखाली घेतला आहे, अशी माहिती राज्याचे उत्पादन शुल्क व साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

राज्यातील जनतेला दिपावलीच्या शुभेच्छा देताना मंत्री देसाई म्हणाले, सर्वांनी पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करावी, असे आवाहन आम्ही जनतेला केले आहे. गेल्या शंभर दिवसांच्या कालावधीत शिंदे-फडणवीस सरकारने धाडसी व कल्याणकारी निर्णय घेतले आहेत. पावसाने झालेल्या नुकसानीसाठी खूप मोठे पॅकेज आमच्या सरकारने दिले आहे.

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अडीच हजार कोटीं रूपयांचे ५० हजार रूपयांप्रमाणे पहिल्या टप्प्यात अनुदान दिले आहे, असे सांगून मंत्री देसाई म्हणाले, ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेतला. भूविकासचे हजार कोटींचे कर्ज माफ केले आहे. शिंदे, फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील या सरकारने शंभर दिवसात इतक्या वेगाने पळतंय.

Eknath shinde, Shambhuraj Desai
वाढदिवस साजरा न करता पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; एकनाथ पवारांचे आवाहन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले आहे की, ही आराम करण्याची वेळ नाही, आपल्याला लोकांसाठी काम करायचे आहे. मुख्यमंत्री स्वतः १८ तास काम करत आहेत. तर त्यांचे सहकारीही तेवढ्यात वेगाने पळून आपला नेता पळतोय त्यांच्या बरोबरीने व जबाबदारीने काम करणार आहोत. प्रकाशमय महाराष्ट्राच्या उज्वल विकासाच्या दृष्टीने देशात क्रमांक एकचे राज्य बनविण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असे त्यांनी सांगितले.

Eknath shinde, Shambhuraj Desai
स्मार्ट सिटीचं स्वप्न दाखवून पुण्याचं वाटोळं केलं : अजित पवार भाजपवर बरसले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com