
-रवीकांत बेलोशे
Mahabaleshwar News : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रोजच्या धावपळीतून आपल्या गावी महाबळेश्वर तालुक्यातील दरे तांब येथे आल्यावर शेतकरी बनून कामे करतात. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे दोन दिवस भात लागणीत व्यस्त होते.
कोयनाकाठचे शेतकरी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde हे आपल्या गावी दरे तर्फ तांब (ता. महाबळेश्वर) येथे आल्यावर अगदी मनापासून शेतीच्या कामात मग्न राहतात. त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे Shrikant Shinde हे ही आता शेतीत भात लावणी करताना दृष्टीस पडले. आपल्या शेतात त्यांनी मशीनच्या साह्याने चिखलणी केली. त्या पाठोपाठ त्यांनी भाताचा तरवा काढण्यास ही मदत केली.
बऱ्याचदा उच्चपदस्थ मंडळी शेतीच्या नादाला लागत नाहीत. परंतु, मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाने आपल्या गावाची आणि शेतीची नाळ कधीच तुटू देत नाहीत. मी कोण मोठा आहे, हे न दाखवता ते गावी आल्यावर शेतात रमतात. शेतीत झाडे लावणे, स्ट्रॉबेरी लागवड, भात शेती यांची कामे ते आस्थेवाईकपणे करतात. त्यामुळे आता मुख्यमंत्री झाले तरी एकनाथ शिंदे शेतात जात होते. काल आणि परवा खासदार श्रीकांत शिंदे गावी आले होते. ते दोन दिवस भात लागणी करण्यात व्यस्त होते.
पानापानातुन वाढणारे झाड, भातशेतीत मळ्यात वाढणारी भातरोपं, जिवंत बहरणारा हिरवा डोंगर आणि पावसाचा कणाकणात रुजण्याचा सोहळा हे सगळं पाहणे म्हणजे एक ऊर्जा असते. शेतीत राबताना त्या बळीराजाच्या कष्टाची जाणीव आपल्या हातात असलेल्या जबाबदारीची जाणीव देते. आज भाताची लावणी करताना तीच जाणीव प्रत्येक रोपात होती, असे खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय.
गुरं वासरे त्यांचा मुकेपणा, त्यांची माया हे सगळं अबोल असते. पण तरीही ते खूप बोलकं असते. हे गावपण अनुभवण्याचा एक वेगळाच आनंद आहे. निसर्गाचं हे देणं जगण्याचा भाग असणं यापेक्षा वेगळं भाग्य नाही.असे काम केल्यावर पुढील कामात आम्हाला नक्की ऊर्जा मिळते असेही खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.