Solapur News: सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीच्या पाडकामाला सुरुवात; परिसरात कडक बंदोबस्त

चिमणी पाडकामासाठी एक किलोमीटरच्या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे
Shri Siddheshwar Cooperative Sugar Factory
Shri Siddheshwar Cooperative Sugar Factory Sarkarnama
Published on
Updated on

Shri Siddheshwar Cooperative Sugar Factory : सोलापूर मधील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कारवाईवेळी कोणताही अनुचित - कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी कारखान्याच्या एक किलोमीटरच्या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. राज्य राखीव पोलिस बलाच्या आठ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

सोलापूर जालना, मुंबई, नवी मुंबईतील आठ कंपन्या चार दिवसाच्या कालावधीत तैनात करण्यात आल्या असून कारखाना परिसरात प्रचंड फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. श्री सिद्धेश्वर साखर कारखाना परिसराच्या एक किलोमीटर परिसरातील सर्व सभागृह,मंगल कार्यालय,रेस्टॉरंट,बार,हॉटेल्स, धार्मिकस्थळे,प्रार्थनास्थळे बंद राहणार आहेत. (Solapur News)

Shri Siddheshwar Cooperative Sugar Factory
Maharashtra Politics : मुख्यमंत्र्यांची सपशेल माघार; नव्या जाहिरातीत शिंदेंइतकीच फडणवीसांची लोकप्रियता !

नेमकं काय आहे प्रकरण?

सोलापुरातील होटगी रस्त्यावर 350 एकर जमिनीवर विमानतळ आहे. विमानतळाला लागूनच गेल्या ५० वर्षापासून सिद्धेश्वर साखर कारखाना आहे. पण भारतीय विमानतळ विकास प्राधिकरणाच्या अहवालानुसार, कारखान्याच्या चिमणीमुळेच विमानसेवा सुरु करण्यात अडथळए निर्माण होत आहेत. या चिमणीचा अडसर दूर करुन सोलापूरची विमानसेवा सुरु करावी, अशी मागणी केली जात आहे. (Maharashtra Politics)

90 मीटर उंच असलेल्या चिमणीमुळं विमानसेवा सुरु करण्यात अडथळा येत आहे. सोलापूर महापालिका प्रशासनानेही यापूर्वीच सिद्धेश्वरची चिमणी बेकायदेशीर ठरवली असून या प्रकरणी न्यायालयीन लढाईदेखील सुरु आहे. पण दुसरीकडे कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासद शेतकरी, कारखान्याचे कर्मचारी, इतर सभासदांनी आणि  कारखान्यावर उपजीविका अवलंबून असलेले अन्य घटकांनी ही चिमणी पाडण्यास विरोध केला आहे. (Solapur Politics)

साखर कारखान्याच्या चिमणीचा प्रवास..

- 2014 साली कारखान्याच्या विस्तारीकरणातून सह वीज निर्मितीसाठी 92 मीटर उंचीची चिमणी उभरण्यास सुरुवात

- 2017 साली बांधकाम परवाना न घेता बांधकाम पूर्ण झाले

- सिद्धेश्वर कारखान्याचे माजी संचालक संजय थोबडे यांनी अनधिकृत चिमणी विरोधात तक्रार दाखल केली

- महापालिकेच्या नोटीसीनंतर सिद्धेश्वर कारखान्याच्या प्रशासनाने हायकोर्टात धाव घेतली

- मात्र हायकोर्टाने दिलासा देण्यास नकार

- 2018 - अनधिकृत चिमणी पाडण्यासाठी सोलापूर महापालिका प्रशासनाकडून चिमणी पाडकामासाठी पथक केले होते

- मात्र शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे कारवाई थांबली

- त्यानंतर सिद्धेश्वर कारखाना प्रशासन सर्वोच्च न्यायालयात गेले

- साखरेचा गाळप हंगामामुळे चिमणी वरील कारवाईला तात्पुरती स्थगिती

- 2019 - विमानसेवेसाठी सोलापूर विकास मंचाची स्थापना

Shri Siddheshwar Cooperative Sugar Factory
Eknath Shinde on Abdul Sattar : मुख्यमंत्र्यांनी सत्तारांचे कान टोचले ; कारभार सुधारा ; तुमचे जे चालले ते वाईट..

2021 - लॉकडाऊन नंतर पुन्हा एकदा विमानसेवा सुरू करण्याची मागणी

2022 - महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारखान्याला क्लोजर नोटीस दिली

- त्यानंतर प्रशासनाकडून कारखान्याचे वीज आणि पाणी पुरवठा तोडण्याचे प्रयत्न

- क्लोजर नोटीस मागे घ्यावी यासाठी कारखान्याकडून हजारोंचा भव्य मोर्चा काढण्यात आला

- 2023 - न्यायालयातील प्रकरण डीजीसीए कडे वर्ग.

- सोलापूर महापालिका आयुक्तांनी स्वतंत्र सुनावणी हे चिमणी पाडण्याचे आदेश दिले

- 45 दिवसाच्या नोटीसीनंतर अखेर 14 जून पासून कारखान्याची अनधिकृत चिमणीचे पाडकाम सुरू

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com