Devendra Fadnavis Vs Ajit Pawar: सोलापूर जिल्ह्यात देवेंद्र फडणवीस-अजित पवार पुन्हा आमने-सामने ! काय आहे कारण ?

Solapur Political News : पोटनिवडणुकीनंतर सोलापूरात आपापला पक्ष वाढवण्याची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर जबाबदारी
Devendra Fadnavis, Ajit Pawar
Devendra Fadnavis, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Solapur News: आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राज्यभरात आपली ताकद वाढण्यासाठी राज्यातील प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे. याचे नियोजन करताना पक्षातील तगड्या नेत्यांना विविध जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यानुसार कामाला सुरूवात झालेली असून आपल्या वाट्याला आलेल्या जिल्ह्यात पक्षाची ताकद कशी वाढेल, याकडे नेत्यांनी आपले नेतृत्व कौशल्या पणाला लावल्याचे दिसून येत आहे.

निवडणुकीच्या रणधुमाळात सोलापूरमध्ये मात्र राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यात सत्तेतील भाजपच्या वतीने खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः उतरले आहेत. परिणामी सोलापूरमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री एकमेकांसमोर ठाकल्याने जागावाटपाचा तिढा निर्माण होणार की सहजतेने सुटणार, याची चर्चा जिल्ह्यासह राज्यात सुरू आहे. (Latest Political News)

Devendra Fadnavis, Ajit Pawar
Shivsena MLA Disqualification Case : शिंदे गटाच्या उत्तरानंतर 16 आमदार अपात्रतेच्या कार्यवाहीला वेग

सोलापूर जिल्ह्याच्या पक्ष संघटनेची जबाबदारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवली आहे. तर भाजपच्या वतीने या जिल्ह्याकडे देवेंद्र फडणवील लक्ष देणार आहेत. परिणामी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेसह विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही उपमुख्यमंत्री परस्परविरोधी भूमिका घेणार की सहकार्याची भूमिका घेणार, याकडे सोलापूरचे लक्ष आहे.

दरम्यान, पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आपापल्या पक्षबांधणीसाठी का होईना एकमेकांसमोर आल्याने राजकीय वर्तुळाचे सोलापूरकडे लक्ष वेधले गेले आहे. आगामी निवडणुकांत जिल्ह्यातील राजकीय घडामोडींबाबत हे दोघे काय निर्णय घेणार, याची उत्सुकता आहे.

Devendra Fadnavis, Ajit Pawar
Bachchu Kadu On State : बच्चू कडूंचा 'प्रहारी' इशारा ! म्हणाले, "आम्ही उठलो तर सरकार..."

मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर पंढरपूर-मंगळवेढा हा मतदारसंघ राष्ट्रवादीला गमवावा लागला होता. येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालकेंच्या अकाली निधनानंतर पोटनिवडणूक लागली. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत ही जागा भाजपकडून फडणवीस तर राष्ट्रवादीकडून अजित पवारांनी प्रतिष्ठित केली होती. या दोघांच्या लढाईत फडणवीसांनी बाजी मारत भाजपचे समाधान आवताडे यांना विधानसभेत बसवले. यासाठी माजी आमदार प्रशांत परिचाकांचीही साथ मिळाली. यामुळे मंगळवेढ्याचा आमदार होण्याचे भाग्य मंगळवेढेकरांना फडणवीसांमुळे मिळाल्याचे बोलले जात आहे. आता या जागेबाबत अजित पवार (Ajit Pawar) काय निर्णय घेणार, याकडे लक्ष आहे.

दरम्यान, तत्कालीन राष्ट्रवादीने गेलेली जागा परत घेण्याच्या दृष्टीने पंढरपूर-मंगळवेढातून विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांना संभाव्य चेहरा म्हणून निश्चित केले होते. यामुळे पराभूत उमेदवार भगीरथ भालके यांनी बीआरएस ची वाट धरली. बंडानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अभिजीत पाटलांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. या स्थितीत अजित पवार आपल्या गटाचा उमेदवार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे पवार हे सत्तेचा धर्म पाळत पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघ भाजपला देणार का? याची चर्चा सुरू झाली आहे.

Devendra Fadnavis, Ajit Pawar
Rohit Pawar News : जयंतराव शेवटपर्यंत राष्ट्रवादीतच..; रोहित पवारांनी संजयकाकांना खडसावले ; म्हणाले, 'सांगलीच्या लोकल नेत्यांकडे लक्ष देऊ नका,'

मंगळवेढ्यात लोकसहभागातून उभारण्यात येत असलेल्या थोर महापुरुषांच्या पुतळा करण्यासाठी शासनाने निधी द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या एका गटाने उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे केली. त्यामुळे मंगळवेढ्यात अस्तित्व नसलेल्या अजित पवारांच्या गटाचे अस्तित्व निर्माण करू शकता येण्याची परिस्थिती आहे. मात्र हा राष्ट्रवादीचा गट आगामी काळात स्थानिक निवडणुकीत वरिष्ठ नेत्याचे ऐकून राजकीय भूमिका घेणार, की स्वबळावर निर्णय घेणार हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com