Municipal elections : नगरपालिका निवडणुका यासाठी पुढे ढकलल्या जाताहेत ; माजी मुख्यमंत्र्यांनी सांगितले कारण..

Prithviraj Chavan : आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र येऊन लढणार असल्याने राज्य सरकार निवडणुका घेण्याचे धाडस दाखवत नाही.
  election
election sarkarnama
Published on
Updated on

Prithviraj Chavan :चाळीस आमदारांसह शिवसेनेतून बाहेर पडलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी भाजपसोबत (BJP) एकत्र येत सहा महिन्यापूर्वी राज्यात मोठं सत्तांतर घडून आणलंय.

शिंदे - फडणवीस सरकार आल्यापासून महाविकास आघाडीकडून (MVA) सातत्याने टीका केली जात आहे. अशातच शिंदे गटात विविध कारणांमुळे नाराजी असल्याची सध्या चर्चा आहे.

विरोधकांकडून गेल्या काही दिवसांपासून शिंदे-फडणवीस सरकारवर सातत्याने टीका केली जातेय. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी थेट शिंदे गटावरच याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. याच नाराजीतून शिंदे गटामध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे.

तर दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत, याचे कारण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी सांगितले आहे. चव्हाण पत्रकार परिषदेत बोलत होते. चव्हाणांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

  election
Nana Patole : भाजप पाठोपाठ काँग्रेसनेही बारामतीत लक्ष घातले....

"राज्यात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर आली आहेत, त्यामुळे अस्थिर परिस्थिती आहे. त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र येऊन लढणार असल्याने राज्य सरकार निवडणुका घेण्याचे धाडस दाखवत नाही. सतत या निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत," असा थेट आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

  election
West Bengal: भष्ट्राचारी नेत्यांचे दाबे दणाणले ; TMC चा मोठा निर्णय

कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका या वर्षाच्या पहिल्या तिमहित होण्याची चिन्हे आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विषय सध्या न्यायालयीन प्रक्रियेत अडकला आहे. बारामतीसह ९२ नगरपालिकांच्या निवडणुका या ओबीसी घ्घ्यायच्या की आरक्षण लागू करायचे हा विषय न्यायालयासमोर आहे.

मुंबईसह राज्याच्या विविध महानगरपालिकांमधील प्रभाग रचनेचा विषयही न्यायालयात प्रलंबित आहे. सत्तांतर होताच शिंदे-फडणवीस सरकारने प्रभागांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला.नगरपालिकांमधील ओबीसी आरक्षण, महापालिकांची प्रभाग रचना आदी सारे विषय सध्या सर्वोच्च आणि उच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहेत. जानेवारीतील सुनावणीत निवडणुकांवर मार्ग निघेल, असा विश्वास व्यक्त केला जातो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com