मुंबई - देशातील पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅसमध्ये दरवाढ होत असतानाच राज्यात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे काही वाहन चालक आनंदित झाले आहेत. सीएनजी इंधनावरील मुल्यवर्धीत कर (व्हॅट) कमी करण्याचा निर्णय अजित पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर केला होता. त्यानुसार कर प्रणालीत बदल करण्यात येत आहे. ( CNG will be cheaper due to Ajit Dada's announcement )
देशातील प्रदुषण कमी व्हावे यासाठी केंद्रासह राज्य सरकार प्रयत्न करत आहे. इलेक्ट्रिक व सीएनजीवर भर दिला जात आहे. यातून प्रदुषण पातळी कमी होण्यास मदत होणार आहे. इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर मोठ्या प्रमाणात सपशिडी देण्यात येत आहे. तर राज्य सरकारने सीएनजीचा वापर वाढावा यासाठी सीएनजीवरील कर कमी केला आहे.
अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात घोषणा केल्याप्रमाणे सीएनजी इंधनावरील मुल्यवर्धीत कराचा (व्हॅट) दर 13.5 टक्क्यांवरुन 3 टक्के इतका कमी केल्याची अधिसूचना काल अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जारी करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील वित्त विभागाने काल जारी केलेल्या अधिसूचनेप्रमाणे 1 एप्रिलपासून राज्यात सीएनजी इंधन स्वस्त होणार आहे.
या निर्णयाचा फायदा ऑटोरिक्शा, टॅक्सी चालकांसह, प्रवासी वाहतूक करणारी वाहने तसेच नागरिकांना होणार आहे. प्रदुषण नियंत्रणासाठीही हा निर्णय महत्वाचा आहे. सीएनजीचे कमी झालेले नवे दर 1 एप्रिल 2022 पासून लागू होतील. पुणे, मुंबई, नागपूर सारख्या मोठ्या शहरांसह राज्यातील काही छोट्या शहरांतही सीएनजी वाहने खरेदी करण्याचा कल वाढला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.