Ladki Bahin Yojana: बहीण लाडकी मग भावाचं काय? लाडक्या जावई, दाजीचं पण बघा! कोल्हापूरच्या रांगडी...

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Maharashtra Politics: कोल्हापूरच्या रांगडी भाषांचा छंद जोपासत त्याने कोल्हापूरची ही भाषा विनोदाच्या माध्यमातून आणि कौटुंबिक विनोद करत जगभर पोहचवल्या आहेत.
Ladli Behna Yojana Maharashtra
Ladli Behna Yojana MaharashtraSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: महायुती सरकारनं लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) ही योजना जाहीर करून महिलांच्या खात्यावर प्रति महिना दीड हजार देण्याची घोषणा केली आहे. यावरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगला आहे. कोल्हापूरच्या कॉमेडी बाळू अण्णा रीलच्या माध्यमातून सरकारकडे (Eknath Shinde) मजेदार मागणी केली आहे.

सध्या या कॉमेडी आण्णाच्या मागणीला सोशल मीडियावर चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. इंस्टाग्रामवर त्यांचा रील्स तुफान व्हायरल झाला आहे. त्याने सरकारवर टीका करण्यासाठी हा व्हिडिओ केला नसून केवळ मनोरंजनासाठी हा व्हिडिओ केला असल्याचाही सांगत लाडक्या भावाचं काय? लाडक्या बहिणीसोबत लाडक्या जावई आणि दाजीचं पण काय तर बघा? असं आवाहन सरकारकडे केले आहे.

सध्या इंस्टाग्रामवरील अनेक रील्स चांगलेच व्हायरल होत असतात. कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी असणारा आणि इंस्टाग्रामवर फेमस असणारा कॉमेडी बाळू आण्णा जिल्ह्यात नव्हे तर राज्यात प्रसिद्ध आहे. कोल्हापूरच्या रांगडी भाषांचा छंद जोपासत त्याने कोल्हापूरची ही भाषा विनोदाच्या माध्यमातून आणि कौटुंबिक विनोद करत जगभर पोहचवल्या आहेत. जनतेच्या भावनेलाच हात घालून थोडीफार करमणूक करत नेटकऱ्यांना हसवण्याचे काम कॉमेडी आण्णा आपल्या रोजच्या रील्समधून करीत असतो.

महायुती सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या लाडकी बहीण या योजनेवरून देखील कॉमेडी बाळू आण्णाने केवळ करमणूक म्हणून लाडक्या बहिणीचा रील्स समाज माध्यमावर व्हायरल केला आहे.

Ladli Behna Yojana Maharashtra
Balwant Wankhede: नवनीत राणांना काँग्रेसनं डिवचलं; खासदार वानखडे यांना कार्यकर्त्यांनी दिली 'ही' भेट

त्यामध्ये बाळू आण्णाने सरकारने फक्त लाडक्या बहिणीची काळजी केली. भावाचं काय? असा रांगडा भाषेत सवाल करत सरकारने लाडक्या जावई, दाजीचं पण बघावं. अशी मागणी बाळू आण्णाने केली आहे. इतकंच नव्हे तर सरकारने आमच्याकडे लक्ष नाही दिले. तर आम्ही टाळ घेऊन पंढरीच्या वारीला जाऊ, असा विनोद देऊन करमणूक केल्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com