Hasan Mushrif Vs Sanjay Mandlik : शिंदे गटाचे विनाकारण आकांडतांडव; अजित पवार गटाचा पलटवार

Eknath Shinde And Ajit Pawar : दीड कोटीच्या रस्त्याच्या प्रकरणावरून कोल्हापुरात महायुतीत कलगीतुरा
Hasan Mushrif, Sanjay Mandlik
Hasan Mushrif, Sanjay MandlikSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Politics : सत्तेत सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादीचा अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटात धुसफूस पाहायला मिळत आहे. शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये समन्वय असल्याचे सांगण्यात येत असले तरी स्थानिक पातळीवर अनेकदा तिन्ही पक्षांतील नेते आमने-सामने आल्याची उदाहरणे आहेत. आता कोल्हापूरतही या दोन्ही पक्षातील वाद चव्हाट्यावर आला आहे. परिणामी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील या पक्षांत राजकीय नाट्य रंगण्याचे बोलले जात आहे. (Latest Political News)

शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांच्या निधीतून मुरगुड परिसरात रस्त्याचे काम सुरू आहे. या कामात मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यत्यय आणून, अडवणूक केल्याचा आरोप शिवसेना-शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष, मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजे खान जमादार यांनी केला. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. मुश्रीफांवर केलेल्या थेट आरोपामुळे अजित पवार गटही आक्रमक झाला आहे.

Hasan Mushrif, Sanjay Mandlik
IAS Officer Transfer : 'सरकारनामा'चा दणका, 'आयएएस' अश्विनी जोशी यांची थेट बदलीच, 'ई- लायब्ररी'चे टेंडर भोवले

'जमादार हे ऐन खासदारकीच्या निवडणुकीच्या तोंडावरच प्रा. संजय मंडलिक यांना अडचणीत आणत आहेत. ते विनाकारण आकांडतांडव आणि आक्रस्ताळेपणा करतात', असे प्रत्युत्तर गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील व कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक प्रताप माने यांनी दिले. दरम्यान, कडगाव-बेकनाळ-बाळेघोल रस्त्यावरील पुलाचे काम मंत्री मुश्रीफांच्या मागणीनुसारच मंजूर झालेले आहे. गोंधळ घालण्यापूर्वी राजे खान जमादारांनी मुश्रीफ किंवा आमच्याशी चर्चा केली असती तर पुढील कृत्य टाळता आले असते, असा पलटवारही त्यांनी केला. (Maharashtra Political News)

वादानंतर अजित पवार गटाने एक पत्रकच काढले आहे. त्यात संबंधित रस्त्याबाबत संपूर्ण माहिती देऊन शिंदे गटावर निशाणा साधला आहे.'तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमध्ये खासदारांना निधी देण्याचे कोणतेही धोरण ठरलेले नव्हते. तरीही हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी खासदार मंडलिक यांना कोट्यवधीचा स्वतःचा निधी दिला. मोठा निधी देऊनही अवघ्या दीड कोटीच्या रस्त्याच्या कामासाठी जमादारांनी अकांडतांडव केला. ऐन लोकसभेमुळे सामंजस्याने वागण्याची ही वेळ आहे. जमादार आक्रस्ताळेपणा कशासाठी करतात. त्यांना खासदार मंडलिकांनी समज देण्याची गरज आहे.'

(Edited by Sunil Dhumal)

Hasan Mushrif, Sanjay Mandlik
Delhi Liquor Scam: दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात नवा ट्विस्ट; तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या मुलीला ईडीचे समन्स

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com