Sangli News : विश्वजित कदमांना कडेगावातच धक्का : काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश

कडेगाव हा काँग्रेसचे नेते तथा आमदार विश्वजित कदम यांचा गृहतालुका आहे.
Congress Activists Join BJP
Congress Activists Join BJPSarkarnama
Published on
Updated on

कडेगाव (जि. सांगली) : कडेगाव (Kadegaon) तालुक्याच्या सोनहिरा खोऱ्यातील काँग्रेसच्या (Congress) कार्यकर्त्यांनी भाजपचे (BJP) जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख (Sangram Singh Deshmukh) यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. कडेगाव हा काँग्रेसचे नेते तथा आमदार विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांचा गृहतालुका आहे. कदम हे कडेगाव-पलूस मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. (Congress Activists from Kadegaon taluka join BJP)

ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर तालुक्यात सध्या कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेशाला चांगलाच वेग आला आहे. गेल्या दहा ते पंधरा दिवसांत काँग्रेसमध्ये इनकमिंग सुरू झाले आहे. आता भाजपमध्येही इनकमिंग सुरू झाले आहे. सोनहिरा खोऱ्यातील पाडळी येथील हणमंत शंकर गुरव, लक्ष्मण भीमराव पवार, तर चिंचणी येथील प्रकाश कुंभार, जयराम माने यांनी पृथ्वीराज देशमुख व संग्रामसिंह देशमुख यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

Congress Activists Join BJP
Gram Panchayat Election : सिंधुदुर्गात झाली; रत्नागिरीत सरपंचपदावरून बाळासाहेबांची शिवसेना-भाजपची युती अडली

पृथ्वीराज देशमुख म्हणाले, ग्रामीण भागापासून दिल्लीपर्यंत भाजपाचे सरकार आहे. केंद्रातील व राज्यातील सरकार हे शेतकरी, कष्टकरी, उपेक्षितांच्या हिताचे निर्णय घेत आहे. त्यामुळे भाजपमध्ये अनेक कार्यकर्त्यांचा ओढा वाढत आहे. भाजपमध्ये होत असलेले पक्षप्रवेश आगामी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, लोकसभा, विधानसभेसाठी फायदेशीर ठरणारे आहेत. पक्षांमध्ये प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना निष्ठेची व सन्मानाची वागणूक दिली जाईल, अशी ग्वाही देशमुख यांनी यावेळी दिली.

Congress Activists Join BJP
Ratnagiri : उदय सामंतांनी निष्ठावंत सहकाऱ्याच्या खांद्यावर सोपवली महत्वाची जबाबदारी

यावेळी उदय पाटील, प्रदीप पाटील, श्रीपती माने, सद्दाम मुल्ला, महादेव मोहिते, अशोक माने, आकाश पाटील, युवराज पाटील, किरण पाटील, सोमनाथ जाधव, राजाराम पवार, हणमंत पाटील, माणिक पाटील, धनाजी पाटील, संजय पवार, संभाजी पवार, आनंदा पवार, शंकर पालकर आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com