Congress first list: कोल्हापूर दक्षिणमधून ऋतुराज पाटील यांना उमेदवारी; पण धंगेकरांनी शेअर केलेली पहिली यादी डिलीट

Congress announced Ruturaj Patil candidate from Kolhapur South:साकोली मतदारसंघातून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ब्रह्मपुरीमधून विजय वडट्टीवार, संगमनेरमधून बाळासाहेब थोरात, कराड दक्षिण मधून पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह पंधरा उमेदवारांची नावे या यादीमध्ये आहेत.
Congress
Congress Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील जागा वाटपावर अजूनही एकमत झालेले नाही. जवळपास 218 जागांवर एकमत झाले असून उरलेल्या सात जागांवर अद्याप महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांचे बैठकीचे सत्र सुरू आहे.

काँग्रेसकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या उमेदवारांची पहिली यादी पुण्यातील आमदार आणि काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर यांनी आपल्या सोशल मीडिया पेजवरून व्हायरल केली होती. मात्र काही क्षणातच त्यांनीही पोस्ट डिलीट केली.

या यादीमधून राज्यातील 15 मतदारसंघातील उमेदवारांची नावे काँग्रेसने जाहीर केली आहेत. मात्र अधिकृत काँग्रेसकडून कोणतीच माहिती आली नाही. मात्र धंगेकरांनी ही पोस्ट व्हायरल केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

काँग्रेसने राज्यातील पहिल्या 15 उमेदवारांची नावे या यादीमध्ये जाहीर केली आहेत. साकोली मतदारसंघातून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ब्रह्मपुरीमधून विजय वडट्टीवार, संगमनेरमधून बाळासाहेब थोरात, कराड दक्षिण मधून पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह पंधरा उमेदवारांची नावे या यादीमध्ये आहेत.

Congress
Heena Gavit: आमदार-खासदार पिता-पुत्राचा 'गेम' करण्यासाठी माजी खासदार विधानसभेच्या मैदानात

कोल्हापूर जिल्ह्यातील दहा पैकी पाच विधानसभा मतदारसंघ काँग्रेस आपल्याकडे घेण्याच्या तयारीत आहेत. कोल्हापूर उत्तर कोल्हापूर दक्षिण करवीर आणि हातकलंगले हा मतदारसंघ काँग्रेसकडे राहणार असल्याची शक्यता आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील सस्पेन्स कायम आहे. असाच कोल्हापूर दक्षिण मधून आमदार ऋतुराज पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रवींद्र धंगेकर यांनी व्हायरल केलेल्या यादीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून एकमेव आमदार ऋतुराज पाटील यांचे नाव आहे. पहिल्या यादीत ऋतुराज पाटील यांचे नाव असल्याने संबंधित पोस्ट कोल्हापूर जिल्ह्यात प्रचंड व्हायरल होत आहे.

पहिल्या यादीमध्ये कुणाकुणाची नावे?

  1. साकोली-नाना पटोले

  2. ब्रह्मपुरी-विजय वडेट्टीवार

  3. संगमनेर-बाळासाहेब थोरात

  4. कराड दक्षिण- पृथ्वीराज चव्हाण

  5. लातूर शहर -अमित देशमुख

  6. तिओसा-यशोमती ठाकूर

  7. कोल्हापूर दक्षिण-ऋतुराज पाटील

  8. सोलापूर शहर मध्य.-बाबा मिस्त्री

  9. सोलापूर दक्षिण-धर्मराज कडाडी

  10. कसबा पेठ -रवींद्र धंगेकर

  11. अरणी-जितेंद्र मोघे

  12. आमगाव-दुष्यंत कीरसन

  13. उरण-महेंद्र घरात

  14. वांद्रे वेस्ट-असिफ झाकरला

  15. मालाड वेस्ट-असीम शेख

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com