Solapur News : सोलापूर लोकसभा राष्ट्रवादीला सोडला, तर तुम्ही आम्हाला बारामती सोडणार का? काँग्रेसचा रोहित पवारांवर पलटवार

विनाकारण आघाडीत बिघाडी होईल. मतदारसंघ बदलाचा निर्णय राष्ट्रीय पातळीवर होतो, असेही नरोटे म्हणाले.
Rohit Pawar-Chetan Narote
Rohit Pawar-Chetan NaroteSarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ‘सोलापूर (Solapur) लोकसभा मतदारसंघ (Lok Sabha constituency) राष्ट्रवादीला द्यावा’ अशी मागणी सोलापूर दौऱ्यादरम्यान केली होती. त्याचा काँग्रेसकडून (Congress) आक्रमक भाषेत समाचार घेण्यात आला आहे. ‘सोलापूर लोकसभेची जागा राष्ट्रवादीला सोडली तर आम्हाला बारामती (Baramati) मतदारसंघ देणार आहात का,’ असा खडा सवाल काँग्रेसचे सोलापूर शहराध्यक्ष चेतन नरोटे (Chetan Narote) यांनी रोहित पवारांना केला आहे. (Congress' Answer to Rohit Pawar's demand to leave Solapur Lok Sabha constituency to NCP)

रोहित पवार हे सोमवारी सोलापूरच्या दौऱ्यावर हेाते. त्यावेळी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा होणारा पराभव पाहून ही जागा राष्ट्रवादीला सोडावी, अशी मागणी केली होती. त्यावर चेतन नरोटे यांनी बारामतीसंदर्भात विधान करत रोहित पवारांना प्रतिसवाल केला आहे. ते म्हणाले की, सोलापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे असून तो कायम काँग्रेसकडेच आहे. त्यामुळे सोलापूर लोकसभा राष्ट्रवादीकडे द्यावा, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी करू नये. विनाकारण आघाडीत बिघाडी होईल, असे वक्तव्य टाळावीत, असा सल्लाही नरोटे यांनी दिला. मतदारसंघ बदलाचा निर्णय राष्ट्रीय पातळीवर होतो, असेही ते म्हणाले.

Rohit Pawar-Chetan Narote
Rajan Patil News : राजन पाटलांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला? : पक्षांतराबाबत माजी आमदारांचाही गौप्यस्फोट

सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा १९५२ पासून काँग्रेसकडे आहे. या मतदारसंघात काँग्रेसला मानणारा वर्ग इतर पक्षांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. त्यामुळे या मतदारसंघाचे नेतृत्व कायमच काँग्रेस करेल, असे नरोटे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दोनवेळा हा मतदारसंघ आमच्याकडे द्यावा, अशी चुकीची मागणी केल्याचे ते म्हणाले.

Rohit Pawar-Chetan Narote
थोरातांच्या राजीनाम्यावर शिंदे म्हणतात ‘काळजी करण्याचे कारण नाही...’

सर्वकाही सुरळीत सुरु असून आगामी महापालिका निवडणुकीत आपण सर्वजण महाविकास आघाडी करून लढणार आहोत. पण, काहीतरी चुकीचे वक्तव्य करून महाविकास आघाडीत फूट पाडण्याचे काम कोणीही करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. सोलापूर लोकसभेची जागा राष्ट्रवादीला सोडल्यावर आम्हाला बारामती मतदारसंघ देणार आहात का, असा प्रतिप्रश्न देखील नरोटे यांनी या वेळी केला. आमदार रोहित पवार हे सोमवारी (ता. ६) सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघाबद्दल केलेल्या वक्तव्याचा नरोटे यांनी समाचार घेतला.

Rohit Pawar-Chetan Narote
Maharashtra Politics : 'तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हा' : ‘केसीआर’ची राजू शेट्टींना ऑफर

हा निर्णय राष्ट्रीय पातळीवर होतो

माढा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे, तर सोलापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. मतदारसंघ बदलण्याचा निर्णय राष्ट्रीय नेते घेत असतात. कोणत्याही पक्षाचा आमदार किंवा पदाधिकारी काहीतरी बोलला म्हणजे मतदारसंघात बदल होत नसतो. लोकसभेचा मतदारसंघ बदलणे म्हणजे महापालिकेचा वॉर्ड दुसऱ्या पक्षाकडे दिला असे नसते. त्यामुळे स्थानिक नेत्यांच्या वक्तव्याला तेवढे महत्त्व देण्याची आवश्यकता नसल्याचेही काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com