Pune News : अजितदादांचा 'मास्टर स्ट्रोक' ; जलसंधारणाची ५० कोटींची कामे मार्गी

Ajit Pawar News : जलसंधारणाची कामे रखडल्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा तोटा होणार होता.
 Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Walchandnagar : अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी इंदापूर तालुक्यासाठी गुड न्यूज दिली आहे. तालुक्यातील जलसंधारणाच्या ५० कोटीच्या विकासकामावरील स्थगिती उठवली आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील जलसंधारणाची कामे आता मार्गी लागणार आहेत.

अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी त्यांच्याकडे पाठपुरावा करुन स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. भरणेंच्या प्रयत्नांना यश आले आहे. याबाबत दत्तात्रेय भरणे म्हणाले, "अजितदादांकडे अर्थ खात्याची जबाबदारी आहे. इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे त्यांनी सांगितले,"

 Ajit Pawar
Sanjay Gaikwad on Rajendra Shingne : राष्ट्रवादीचा पालकमंत्री नको रे बाबा ! ; शिंदे गटातील आमदाराच्या विधानामुळे नवा वाद

या गावांना होणार फायदा

अजित पवारांनी ५० कोटी रुपयांच्या विकासकामांची स्थगिती उठवल्याने मदनवाडी, पिंपळे,कळस, कचरेवाडी, गोखळी, गलांडवाडी, गोतोंडी, तरंगवाडी,निमगाव केतकी,कालठन नं १,रेडा, खोरोची, रेडणी, निमसाखर, रणगाव, निंबोडी,बोरी, काझड, चाकाटी, बोराटवाडी,बावडा,कळंब, भांडगाव,काटी,कौठली, पिटकेश्र्वर, शिरसटवाडी, दगडवाडी ,सराफवाडी, कडबनवाडी, व्याहळी, काळेवाडी,भावडी, शेटफळगडे व न्हावी या गावामधील जलसंधारणाची कामे मार्गी लागणार आहेत.

 Ajit Pawar
Ajit Pawar : शिंदे गटाच्या आमदारांना अजितदादांनी दिला शब्द ; 'सर्वांना निधी मिळेल..'

६५ ठिकाणी साठवण बंधारे

इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री असताना इंदापूर तालुक्यासाठी कोट्यावधी रुपयांचा विकास निधी खेचून आणला होता. जलसंधारण खात्याचे राज्यमंत्री असताना त्यांनी तालुक्यातील ६५ ठिकाणी साठवण बंधारे बांधणे व पाच ठिकाणी रूपांतरित साठवण तलाव करण्यासाठी सुमारे ५० कोटींचा निधी मंजूर केला होता.

या कामांची निविदा ही काढली होती. मात्र राज्यामध्ये सत्ताबदल झाल्यानंतर ५० कोटी रुपयांच्या कामांना नवीन सरकारने स्थगिती दिल्यामुळे कामे रखडली होती. जलसंधारणाची कामे रखडल्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा तोटा होणार होता.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com