Soalapur Poster War : सोलापूरात काँग्रेस-भाजप आमनेसामने; 'पोस्टर वॉर'मुळं राजकारण तापलं

Solapur News : राहुल गांधींची खासदारकी रद्दनंतर काँग्रेस आक्रमक
Posters in Solapur
Posters in SolapurSarkarnama
Published on
Updated on

Congress vs BJP : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची चार वर्षांपूर्वीच्या विधानामुळे खासदारकी रद्द झाली आहे. हा लोकशाहीवर हल्ला असल्याचा आरोप करीत देशभरात काँग्रेसने भाजपविरोधात वातावरण तापविले. दरम्यान, राहुल गांधी यांनी माफीवरून सावरकरांचा वारंवार उल्लेख केला. गांधी सावरकारांचा अपमान करतात, असा आरोप करून भाजपनेही काँग्रेसला प्रत्युत्यर देण्याचे ठरविले आहे. भाजपने राज्यात ठिकाठिकाणी सावरकर गौरव यात्रेचे आयोजन केले आहे.

सोलापूरात काँग्रेसच्या वतीने खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या समर्थनार्थ चौकात पोस्टर लावले आहेत. त्यावर राहुल गांधींचे एक वाक्य नमूद केले आहे. "मै हिंदुस्थान के लोकतंत्र के लिए लड रहा हू, और लडता राहूंगा", असे लिहिले आहे. तसेच भारत जोडो यात्रेतील राहुल गांधीसोबतचा प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांचा फोटो छापला आहे. सोलापूर शहर आणि जिल्हा काँग्रेस (Congress) समितीच्या वतीने हा पोस्टर लावण्यात आला आहे.

Posters in Solapur
Pune Political News : पुणे लोकसभेची पोटनिवडणूक चिंचवड विधानसभेप्रमाणे लगेचच होणार नाही?

राहुल गांधींनी सावरकरांचा आपमान केल्याप्रकरणी भाजपने सावरकर सन्मान रॅलीचे आयोजन केले आहे. त्याची तयारी सोलापूरात (Salapur) सुरू आहे. त्याबाबत शहरात काही ठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहे. हे पोस्टर काँग्रेसने लावलेल्या पोस्टर शेजारीच लावले आहे. त्यामुळे शहरातील काँग्रेस आणि भाजपमधील 'पोस्टर वॉर'वर चर्चा रंगली आहेत. भाजपच्या पोस्टरवर 'हिंदुसंघटक सावरकरजीका अपमान नहीं सहेगा हिंदुस्थान...!' हे वाक्य आहे. तसेच सावरकर गौरव यात्रेचे स्वागत करण्यात आले आहे. यावर काही पदाधिकाऱ्यांचे फोटोही आहेत.

Posters in Solapur
Nana Patole Attacks on State : छत्रपती संभाजीनगरमधील घटनेमागे सरकार; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

दरम्यान, शिंदे-फडणवीस (State Government) सरकारविरोधात वातावरण तापविण्यासाठी महाविकास आघाडीने (MVA) राज्यात वज्रमूठ सभांचे आयोजन केले आहे. त्यानंतर भाजपनेही राहुल गांधींच्या वक्तव्याला प्रत्युत्तर म्हणून राज्यात सावरकर गौरव यात्रेचे आयोजन केले आहे. छत्रपती संभाजीनगर येथे एकाच दिवशी म्हणजे २ एप्रिल रोजी महाविकास आघाडीची सभा आणि भाजपची सावरकर गौरव यात्रा होणार आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com