Pune Political News : पुणे लोकसभेची पोटनिवडणूक चिंचवड विधानसभेप्रमाणे लगेचच होणार नाही?

Pune News : पुणे लोकसभेची पोटनिवडणूक लगेच जाहिर होणार नसल्याचा राजकीय जाणकारांचा अंदाज
Pune Lok Sabha By-Election News
Pune Lok Sabha By-Election NewsSarkarnama

Pune Lok Sabha By-Election News : पुणे लोकसभेचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनानंतर (२९ मार्च) लगेचच भाजपसह कॉंग्रेसनेही (Congress) पोटनिवडणुकीची तयारी तेथे सुरु केली आहे. मात्र, ती चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसारखी लगेचच जाहीर होण्याची शक्यता नसल्याचा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.

भाजपचे (BJP) चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे ३ जानेवारीला निधन झाल्यानंतर लगेचच १५ दिवसांत तेथे पोटनिवडणूक जाहीर झाली होती. त्याजोडीने डिसेंबर महिन्यात निधन झालेल्या भाजपच्याच आमदार मुक्ता टिळक यांच्या कसबा पेठचीही ती पोटनिवडणूक आयोगाने घोषित केली. त्यानुसार २६ फेब्रुवारील मतदान होऊन २ मार्चला निकाल लागला. कसब्याची जागा कॉंग्रेसने पटकावली. तर, चिंचवड भाजपने कशीबशी कायम राखली.

Pune Lok Sabha By-Election News
Mallikarjun Kharge : कर्नाटकात खर्गेंच्या नेतृत्वाचा कस; होम ग्राऊंड देणार अध्यक्षीय इनिंगसाठी पाठबळ...

दरम्यान, चिंचवड व कसबा पोटनिवडणुकीच्या यशापशाची चर्चा सुरु असतानाच मार्चच्या शेवटास बापट यांचेही निधन आ. जगताप आणि आ. टिळक यांच्याप्रमाणे दीर्घ आजाराने झाले. पुण्याच्या खासदारकीची मुदत संपण्यात एक वर्षापेक्षा अधिक काळ बाकी असल्याने तेथे सहा महिन्यांच्या आत पोटनिवडणुक घ्यावी लागणार आहे. त्यामुळे भाजपसह ही जागा आघाडीत वाट्याला असलेली कॉंग्रेस लगेच तयारीला लागली आहे.

त्यांचे नेते व माजी मंत्री विजय वडेट्टीवर यांनी तशी घोषणा लगेच करून टाकली. कारण कसब्याच्या पोटनिवडणुकीत त्यांनी भाजपचा गड उध्वस्त केल्याने त्यांचा हुरुप वाढलेला आहे. तर, दुसरीकडे भाजपच्या जगदीश मुळीक या एका इच्छूकाचेही भावी खासदार म्हणून बॅनर लागल्याने लगेच निवडणुकीचा माहौल तयार होऊ लागला आहे. भाजपचे पुणे शहराध्यक्ष मुळीकांसह सहा, तर कॉंग्रेसकडून दोन नावे उमेदवार म्हणून चर्चेत आहेत.

Pune Lok Sabha By-Election News
Narayan Rane News : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अवमान प्रकरणात नारायण राणेंना मोठा दिलासा

भावनेच्या लाटेचा फायदा व्हावा चिंचवडच्या आमदारांच्या निधनानंतर पंधरा दिवसांतच तेथील व कसब्याचीही पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. मात्र, कसब्यात भाजपचा पराभव झाला. तर, चिंचवडमध्ये अपक्ष उमेदवार आणि ठाकरे गटाचे बंडखोर राहूल कलाटेंमुळे भाजपचा कसाबसा विजय झाला. त्यामुळे पराभव झालेल्या कसब्याचा समावेश असलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात चिंचवडसारखी पंधरा दिवसातंच लगेच पोटनिवडणुक जाहीर होण्याची घाई केली जाणार नाही, ती महिन्याभरात होऊ शकते, असा अंदाज राजकीय तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com