Solapur Congress : सुशीलकुमार, प्रणिती शिंदेंच्या निर्णयामुळेच सोलापुरात काँग्रेसचा पराभव; जिल्हाध्यक्षांचा गंभीर आरोप

Assembly Election Defeat : सोलापूर दक्षिण, सोलापूर शहर मध्य आणि पंढरपूर-मंगळवेढा या विधानसभेच्या जागा काँग्रेस पक्षाने लढवल्या होत्या. त्यातील एकाही जागेवर काँग्रेस पक्षाला यश आले नाही.
Sushil Kumar-Praniti Shinde-Dhavalsinh Mohite Patil
Sushil Kumar-Praniti Shinde-Dhavalsinh Mohite Patil Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 29 November : विधानसभा निवडणुकीत स्थानिक नेत्यांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे सोलापुरात काँग्रेस पक्षाचे नुकसान झाले आहे, असा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी नाव न घेता ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर केला. त्यासंबंधीचा अहवाल आपण लवकरच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना देणार आहोत, असेही मोहिते पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतील पराभवावरून सोलापूर काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद पेटण्याची चिन्हे आहेत.

विधानसभा निवडणुकीतील (Assembly Election) काँग्रेस पक्षाच्या पराभवाला धवलसिंह मोहिते पाटील यांनी पक्षाच्या स्थानिक नेत्यांना जबाबदार धरले आहे. ते म्हणाले, सोलापूर दक्षिण मतदारसंघातून काँग्रेस पक्षाने माजी आमदार दिलीप माने यांना ए बी फॉर्म का दिला नाही?, ही गोष्ट शेवटपर्यंत कळू शकली नाही.

प्रदेश स्तरावरून मित्रपक्षांना मदत करण्याचा आदेश प्रदेशाध्यक्षांनी दिला होता. मात्र, सोलापूर दक्षिण मतदार संघात उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांसोबत काँग्रेसचे (Congress) नेते प्रचारात एकत्र दिसायला हवे होते. मात्र, ते चित्र या मतदारसंघात दिसले नाही. उलट अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्या प्रचारात काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Sushil Kumar-Praniti Shinde-Dhavalsinh Mohite Patil
Ashok Chavan : 'मी मुख्यमंत्री, त्यावेळी काँग्रेसच्या 82 जागा होत्या, पृथ्वीराजबाबांनी त्या 42 केल्या अन्‌ नानांनी 16 वर आणल्या'

शेवटच्या दिवशी तर ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांनी धर्मराज काडादी यांना काँग्रेस पक्षाचा अधिकृत पाठिंबा जाहीर केला, ही भूमिका शिंदे यांनी का घेतली, हेही अजून गुलदस्त्यात आहे, असेही मोहिते पाटील यांनी म्हटले आहे.

मित्रपक्षांना मदत करायची नव्हती, तर सोलापूर दक्षिण मतदार संघात काँग्रेसने मैत्रीपूर्ण लढत का होऊ दिली नाही. काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा का दिला, असा सवालही जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी उपस्थित केला आहे. सोलापुरात विधानसभा निवडणुकीत घडलेल्या घडामोडींचा अहवाल आपण प्रदेशाध्यक्षांना देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Sushil Kumar-Praniti Shinde-Dhavalsinh Mohite Patil
Mahavikas Aghadi : पराभवानंतर महाआघाडीत वादाला तोंड फुटले; पंढरपुरात भालकेंचा पराभव राष्ट्रवादीमुळेच, काँग्रेसचा आरोप...

दरम्यान, सोलापूर दक्षिण, सोलापूर शहर मध्य आणि पंढरपूर-मंगळवेढा या विधानसभेच्या जागा काँग्रेस पक्षाने लढवल्या होत्या. त्यातील एकाही जागेवर काँग्रेस पक्षाला यश आले नाही. उलट खासदार प्रणिती शिंदे तीन वेळा जिंकून आलेल्या सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून पक्षाच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सोलापूरमध्ये काँग्रेस पक्षावर मोठी नामुष्की वाढवली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com