Congress News: विधानसभेनंतर काँग्रेस डिस्टर्ब? नगरसेवकांची दांडी, नव्या प्रदेश सरचिटणीसांपुढे आव्हानांचा मोठा डोंगर

Kolhapur Congress Politics : काँग्रेस कमिटीत झालेल्या बैठकीत काही काँग्रेस नगरसेवकांची पाठ या बैठकीकडे दिसली. शिवाय ज्या राजेश लाटकर यांना काँग्रेसने सर्वात पहिली उमेदवारी दिली. ते देखील या बैठकीत उपस्थित नव्हते.
Congress News
Congress NewsSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये अस्वस्था पसरली आहे. त्यातच काँग्रेसच्या (Congress) नशिबी दारुण पराभव झाल्यानंतर प्रमुख पदाधिकाऱ्यांमधील उत्साह कमी झाला आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीमुळे झालेल्या राजकारणामुळे काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी नकळतपणे काढता पाय घेतला.

सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्यासाठी काँग्रेसचा आक्रमकता जवळपास संपुष्टात आल्याचे चित्र कोल्हापुरात आहे. तर विधानसभा निवडणुकीनंतर आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वतःच्या राजकीय भवितव्याची चिंता करत अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मधील उत्साह कमी केला आहे. काहींनी इतर पक्षाचा रस्ता धरण्याचा विचार केला आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसची मोट पुन्हा बांधण्यासाठी नव्या प्रदेश सरचिटणीसांपुढे आव्हान असणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर (Kolhapur) लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला यश मिळाल्यानंतर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या वाट्याला पाच जागा घेत महाविकास आघाडीत वर्चस्व मिळवले. त्यानिमित्ताने शिरोळ आणि चंदगड मधील काँग्रेस कार्यकर्ता जागा झाला.

पण कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवारीमुळे नाराज झालेल्या अन्य पदाधिकाऱ्यांच्या रोषाचा फटका निवडणुकीत बसला. त्यामुळे उत्तर ची जागा देखील काँग्रेसला गमवावी लागले. काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी खाजगीत नेतृत्वावरच शंका उपस्थित केली. त्यामुळे कोल्हापूर शहर इंग्लिश मधील परिस्थिती सध्या तरी विस्कळीत दिसते.

Congress News
Kunal Kamra Apologise : मोठी बातमी: स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं माफी मागितली; पण एकनाथ शिंदेंची...

सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसकडून प्रमुख दोन ते तीन आंदोलन करण्यात आली. मात्र, या आंदोलनाला काँग्रेसच्या काही नगरसेवकांनीच पाठ फिरवत आपली नाराजी दाखवून दिले.

तर अनेकांनी महायुतीतील पक्षप्रवेशाच्या चर्चेला बळ दिले. आज देखील नव्या प्रदेश सरचिटणीस यांच्या निवडीनंतर संजय बालगुडे कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर हीच परिस्थिती पाहायला मिळाली.

Congress News
Shivsena UBT News : विधानसभेला आयात केलेले अन् पक्षाने निष्ठावंत म्हणून उमेदवारी दिलेले सगळेच पळाले! उद्धव ठाकरेंना मराठवाड्यात फटका..

काँग्रेस कमिटीत झालेल्या बैठकीत काही काँग्रेस नगरसेवकांची पाठ या बैठकीकडे दिसली. शिवाय ज्या राजेश लाटकर यांना काँग्रेसने सर्वात पहिली उमेदवारी दिली. ते देखील या बैठकीत उपस्थित नव्हते. एकंदरीतच पाहता काँग्रेसला ग्रामीण भागात सध्या तरी चांगले दिवस आहेत. पण शहरी भागाचा विचार करता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख पदाधिकाऱ्यांना चार्ज करणे हे मोठे आव्हान नव्या प्रदेश सरचिटणीसांपुढे असणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com