

Congress News : जिल्ह्यातील १२ नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचा मोठा दारूण पराभव पत्कारावा लागला आहे. नगरपालिकेतील उमेदवारांचा पराभव हा खासदार प्रणिती शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. पाच नगरपालिकेत नगराध्यक्षपदाचा उमेदवार उभे केले होते, पण पाचही ठिकाणी उमेदवाराचा पराभव झाला आहे.
11 नगरपालिकेपैकी अक्कलकोट नगरपालिकेत २ नगरसेवक निवडून आले आहेत. यामुळे जिल्ह्यात सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसवर पराभवाची नामुष्की ओढवली आहे. मंगळवेढा व पंढरपूर नगरपालिकेत स्थानिक आघाडी केली होती, त्यास आम्ही पाठिंबा दिला असून पंढरपूर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रणिता भालके या काँग्रेसच्या असल्याचा दावा काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी केला आहे.
मोहोळ, बार्शी व अक्कलकोट नगरपालिकेत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे तर अक्कलकोट वगळता इतर ठिकाणी एकही नगरसेवक विजयी झाला नाही. कुर्डूवाडी व मैंदर्गी येथेही नगरपालिकेतही काँग्रेसला पराभवास सामोरे जावे लागले आहे. सांगोला व करमाळा येथे एकही उमेदवार दिले नव्हते. काँग्रेसकडून उभारलेल्या उमेदवारांचा मोठ्या फरकाने पराभव झाला आहे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार काही ठिकाणी चौथ्या तर काही ठिकाणी पाचव्या क्रमांकावर गेले आहेत.
विरोधी पक्षाने निवडणुकीत सर्व बळाचा वापर केला. इतर पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रवेश देऊन तिकिटे दिली. निवडणुकीत धनशक्तीचा वापर केला. काँग्रेसने सर्वसामान्यांना संधी दिली होती. पक्षांसाठी काम करणाऱ्या न्याय देण्याची ही निवडणूक होती. या निवडणुकीत जनशक्तीविरोधात धनशक्तीचा विजय आहे, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार म्हणाले.
नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी पक्षात राहूनच गद्दारी केली आहे. शेवटच्या टप्प्यात विरोधकांना मदत केल्याने काही उमेदवारांचा पराभव झाला आहे. गद्दारी करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांवर कारवाई होण्यासाठी अहवाल प्रदेशपातळीवर पाठवला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.