Solapur News : सावरकरांबद्दल काँग्रेसला कृतज्ञता वाटते : ज्येष्ठ नेत्याने पहिल्यांदाच दिली कबुली

सावरकरांचा मुद्दा हा महाविकास आघाडीचा अजेंडा नाही, त्यामुळे सावरकरांच्या संदर्भात काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे.
Dr. Bhalchandra Mungekar
Dr. Bhalchandra MungekarSarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Veer savarkar) जेलमध्ये असताना त्यांचे आणि त्यांचे कुटुंबीयांचे जे हाल झाले, त्याबद्दल काँग्रेसला (Congress) कृतज्ञता वाटते, असे विधान काँग्रेसचे माजी खासदार तथा ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर (Dr. Bhalchandra Mungekar) यांनी केले. (Congress feels gratitude towards Savarkar : Dr. Bhalchandra Mungekar)

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मध्यंतरी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत मी माफी मागणार नाही; कारण मी सावरकार नाही, गांधी आहे, असे म्हटले होते. त्यावरून महाविकास आघाडीत मतभेद निर्माण झाले होते. मात्र, विरोधी पक्षाच्या बैठकीत शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यासंदर्भात टिपण्णी केल्यानंतर राहुल गांधी आणि एकंदरीतच काँग्रेसकडून सावरकर विषयावर मौन पाळले जात आहे.

Dr. Bhalchandra Mungekar
Nitesh Rane News : पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा नार्वेकरांना भेटायचे; मग काँग्रेस आमदारांना : राणेंचा गौप्यस्फोट

दरम्यान, नियोजन आयोगाचे माजी सदस्य भालचंद्र मुणगेकर हे सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी सावकरांचे जेलमध्ये झालेले हाल, याबद्दल काँग्रेस पक्षाला कृतज्ञता वाटते, असे म्हटले आहे.

सावरकरांचा मुद्दा हा महाविकास आघाडीचा अजेंडा नाही, त्यामुळे सावरकरांच्या संदर्भात काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. मी सावरकर नाही, मी गांधी आहे, असं राहुल गांधी म्हणाले होते. सावरकरांनी जशी माफी मागितली, तशी मी माफी मागणार नाही, असंही राहुल गांधींनी स्पष्ट केलं आहे.

Dr. Bhalchandra Mungekar
Karnataka BJP News : भाजपत मोठी घडामोड : उमेदवार निवडीवर येडियुराप्पा नाराज?; दिल्लीहून तातडीने बंगळूरला परतले

सावरकरांनी माफी मागितली, यामध्ये सावरकरांचा अपमान नसून ती वस्तुस्थिती आहे. याचा अर्थ सावरकरांनी १९११ मध्ये काळ्यापाण्याची शिक्षा भोगण्यासाठी सेल्यूलर जेलमध्ये जाणे, ही वस्तुस्थिती आम्ही नाकारत नाही. पण, त्या सर्व प्रक्रियेमध्ये सावरकरांनी सहा वेळा माफी मागितली, हीसुद्धा वस्तुस्थिती आहे.

Dr. Bhalchandra Mungekar
Solapur News : ‘केसीआर’चा विश्वासू नेता सोलापुरात दाखल : आणखी कोण लागणार गळाला?; काँग्रेस-राष्ट्रवादीलाच धास्ती

दरम्यान, सावरकरांनी सेल्युलर जेलमध्ये गेल्यानंतर त्यांना ११ वर्ष तिथे ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर १९२१ ते १९२४ च्या दरम्यान सावरकर येरवड्याच्या जेलमध्ये होते. तिथपर्यंत सावरकरांचे जे काही हाल झाले, त्यांच्या कुटुंबीयांचे जे हाल झाले. या सगळ्या बाबतींमध्ये काँग्रेसला सुद्धा कृतज्ञता वाटते. मात्र, जशी ही एक बाजू आहे, तशी सावरकरांनी जी माफी मागितली, त्याप्रमाणे १९२९ पासून १९३७ पर्यंत महिन्याला ६० रुपये पेन्शनही घेतली आहे. असंही वक्तव्य नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी सोलापुरात केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com